विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ॲड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवा : खा निलेश लंके

विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ॲड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवा : खा निलेश लंके
👉राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार !
👉ॲड. प्रताप ढाकणे यांचा वाढदिवस थाटात साजरा
👉गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाहीला श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव :        येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शंभर टक्के येणार असल्याने ज्याप्रमाणे मला खासदार केलं त्याप्रमाणे प्रतापरावांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन खा.निलेश लंके यांनी केलं आहे.


शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खंडोबा मैदानावर झालेल्या कार्यक्रमास ॲड. प्रतापराव ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिनकरराव पालवे, शिवसेना (उबाठा) नेते रामदास गोल्हार, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुका अध्यक्ष हरीश भारदे, राहुल राजळे, बंडू बोरुडे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, शेवगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी उपसरपंच एजाज काझी, राहुल मगरे, माधव काटे, प्रकाश घनवट, शिवसेनेचे एकनाथ कुसाळकर, अशोक धनवडे, अमर पुरनाळे, आखेगवचे सरपंच शंकर काटे, यांच्यासह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने होते.


अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना खा निलेश लंके, म्हणाले, प्रतापकाका सरळ आणि प्रामाणिकपणे साथ देणारा अत्यंत प्रेमळ साधा माणूस आहे कोणाशी कधी गद्दारी करणारा नाही अत्यंत कमी बोलणारा पक्का माणूस आहे दोनदा पराजय झाला तरी सामन्याची नाळ तोडली नाही पण त्यांना होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक व खंभीरपणे साथ द्या त्यांना फसवू नका आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जिद्दीने आता पासून लढाई जिंकण्यासाठी तयारी ला लागावे मला तुम्ही खासदार करून दिल्लीत पाठवले आहे त्याप्रमाणे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रतापकाका ला विधानसभेत पाठवा.
शेवगाव शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न, ताजनापुर लिप्ट योजना सह शेवगाव मतदार संघातील प्रलंबित असलेले रस्ते आदी विविध प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून मला मतदारसंघांतील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मला जोडीला हक्काचा माणूस द्या आम्ही दोघं सोबत राहिल्यास पाच वर्षात मतदारसघांचा अनुशेष भरून काढून चेहरामोहरा बदलून टाकू त्यासाठी जागृत राहून विधानसभा जिंकण्यासाठी सर्वांनी जिद्दीने आता पासून निर्धार करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अहावन खा लंके यांनी केले आहे.
यावेळी प्रतापराव ढाकणे म्हणाले आज मला वडील बबनराव ढाकणे यांची दिवसभर आठवण येत होती पण ती उणीव खा निलेश लंके यांनी वडील, भाऊ म्हणून आधार दिला असे सांगून भवणाविवेश झाले निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देवून लोकसभा लढविली गेली यश मिळालं पण मात्र पराभव झाला असता तर आज फिरलो नसते आज जिल्ह्यात प्रस्तपितांच्या विरोधात सामान्य माणसाला साथ देवून समाजासाठी लढा कायम ठेवून सर्वांना बरोबर घेवून काम केलं ते भविष्यातही करू मला आज पर्यंत जे प्रेम दिलं तेच विधानसभा निवडणुकीत द्यावे निस्वार्थीपणे काम करू असे श्री ढाकणे म्हणाले.
वाढदिवसानिमित्त केक कापून पुष्पहार घालून खा. लंके यांनी ढाकणे दांपत्याचा सत्कार केला. तसेच गायक आनंद शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर ॲड. प्रताप ढाकणे यांच्यावरील गायक मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या गीताचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ॲड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर आनंद शिंदे आणि सहकाऱ्यांचा शिंदेशाही हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमास शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सर्व श्रोते, महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माधव काटे यांनी प्रास्ताविक केले. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश ढाकणे यांनी आभार मानले.
———- ———
पाथर्डीचे माजी उपनगराध्यक्ष
ॲड.दिनकरराव पालवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल खा. निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!