वाहनात अवैध घरगुती गॅस भरणाऱ्या रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाची कारवाई ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर:-ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अहमदनगर शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड केला आहे, लोकेशनचे वीडिओ चित्रीकरण जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकाऱ्याना दाखवत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे.
ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील घरगुती (१४.२ किग्रॅ.) ग्राहकांचे हक्काच्या गॅस सिलेंडरचा अवैध वापर अहमदनगर शहरातील एलपीजी वाहन चालक वाहनात भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे निदर्शनास आले होते, यापूरवी देखील नाशिक आयजी कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली होती. या महिन्यात लेखी पत्राद्वारे पुरवठा विभागाला कळविले होते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरु असल्याचे दिसत होते. यामुळे शहरात कधीही मोठा स्फोट होण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे GDKF वतीने देण्यात आलेल्या पत्राची दखल घेत पुरवठा विभागाने संबंधित विभागांना पत्र काढत कार्यवाही करण्यात यावी असे सूचित केले होते.
त्या अनुषंगाने घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर करणा-यांविरुद्ध कारवाई करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध रिपेरिंग सेंटरवर सपना भोवते धान्य वितरण अधिकारी, सेल इन्स्पेक्टर बेले अव्वल कारकून घोलप अनंता मुळे यांच्यासह ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या आदेशानुसार झोनल पी.आर. औ रवींद्र ब्राह्मणे , कृष्णा पवार यांनी
काही अधिकाऱ्यांना घेऊन हवे रिपेरिंग सेंटरवर छापा घालून कारवाई केली
*ज्याठिकाणी घरगुती सिलिंडर सापडले आहे. त्या सर्वांची सखोल चौकशी पोलीस विभागाने करणे गरजेचे आहे. घरगुती सिलिंडर ज्या एजन्सीने काळाबाजार करणान्यांना दिले असेल त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे आणि कठोर कारवाई करावी*. बुधवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी १:०० पुरवठा विभागाने एमआयडीसी परिसरा मध्ये छापा टाकला व गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकास संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक ऑटो रिक्षा क्रमांक MH16CE2494
भारत गॅस चे ०८घरगुती गॅस सिलेंडर आणि एक मोटार, एक इलेक्ट्रिक वजन काटा ,दोन बॅटरी असा मुद्देमाल जप्त केला . परंतु एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यास सहा ते सात तास एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्येच बसावं लागलं. चर्चा अशी ही होती पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. परंतु शेवटी त्यांना वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हा नोंदवा .