संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः केडगाव येथील विठ्ठल सातपुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहे व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचे काम केले जाते, वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून महिलेच्या विशिष्ट भागाला सिगरेटचे चटके देऊन मारहाण करण्याची भाषा वापरली जाते ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे, विठ्ठल सातपुते हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मोबाईलवर बोलताना म्हणतो की मी आबा सातपुते रंगोली हॉटेल दिलीप सातपुतेचा भाऊ सगळ्यांचा बाप अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दाखवत आहे, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम या व्यक्तीकडून होत आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो तरी पोलीस प्रशासनाने आबा सातपुते या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे केले आहे, यावेळी भीमराज आव्हाड, वैभव ढाकणे, कैलास गर्जे, संतोष ढाकणे, राहुल सांगळे, ओंकार आव्हाड, सतीश ढाकणे, रामदास सांगळे, भाऊसाहेब वनवे, संदीप ढाकणे, आकाश जावळे, अजय गीते, विक्रांत पालवे, ओंकार घुले, शुभम आघाव, संकेत दहिफळे, युवराज आव्हाड, अक्षय आघाव, कौस्तुभ गायकवाड, विकास राठोड, योगेश आव्हाड, मल्हारी आव्हाड, तुलसीदास बोडके, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.