संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
लोहगाव – राहाता तालुक्यातील प्रवरा पट्ट्यातील लोहगाव ग्रामपंचायतीची निवडणुकीत बिनविरोध झाली. या निवडणुकीत एकूण १३ सदस्य व सरपंच असे एकूण १४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. उपसरपंच पदासाठी दौलत आप्पासाहेब चेचरे व बळीराम विठ्ठल चेचरे या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. लोहगाव ग्रामपंचायतीच्या मिटिंग हॉलमध्ये निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र पाटील व सरपंच शशिकांत मिलिंद पठारे यांच्या उपस्थितीत झाली.
माजी संचालक भाऊसाहेब कुंडलिक चेचरे यांच्या गटाकडे १० सदस्याचे बहुमताचे संख्याबळ असल्यामुळे बळीराम विठ्ठल चेचरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने दौलत आप्पासाहेब चेचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे व माजी उपसरपंच सुरेश चेचरे हे बळीराम चेचरे यांना म्हणाले की श्रेष्ठींचा आदेश असला तर तुम्ही उमेदवारी अर्ज भरा नाहीतर संख्याबळ नसताना उमेदवारी अर्ज भरण्यास काय अर्थ ? कारण की आपणास एकोप्याने ही निवडणूक करायचे आहे, अशी विनंती त्यांनी बळीराम चेचरे यांना केली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केली.
नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्याच दोन गटांमध्ये यावेळी निवडणूक झाली .या मध्ये विद्यमान गटाला सरपंच पदा सह नऊ दुसऱ्या गटास चार जागा देण्यात आल्या. गेल्या सहा पंचवार्षिक पासून लोहगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे.
कही खुशी कहि गम परंतु एक हाती सत्ता या ग्रामपंचायती मध्ये कधीही राहिलेली नाही व येथून पुढेही राहणार नाही सत्तेचा खांदेपालट करण्यासाठी विखे पाटलांनी यश आलेले आहे.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच शशिकांत मिलिंद पठारे उपसरपंच दौलत आप्पासाहेब चेचरे विद्यमान सदस्य स्वप्निल किरण इनामके, सौ अनिता शंकर तांबे, चेचरे विठ्ठल बळीराम, उज्वला विजय वांगे, सोनवणे दीपक भास्कर, चेचरे अशोक सुखदेव, अनिता रविंद्र गिरमे, भाऊसाहेब कुंडलिक चेचरे, कांबळे अश्विनी, महेश चेचरे, शालिनी शरद गवई, प्रतिभा किरण माळी, नंदा सुरेश या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा व माजी सदस्य यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे, मा.सरपंच स्मिता चेचरे, माजी उपसरपंच सुरेश चेचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निवडी प्रसंगी विरोधी गटाकडून एकही कार्यकर्ता या निवडी प्रसंगी उपस्थित नव्हता. निवडून आलेले सरपंच उपसरपंच व सदस्यांचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा, खा. सुजय विखे पा, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील .माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील. ॲड बाबासाहेब चेचरे, पद्मश्री विखे पाटील कारखान्याची माजी संचालक लहानु चेचरे, माजी सरपंच स्मिता चेचरे, माजी उपसरपंच सुरेश चेचरे,. तंटामुक्तीचे अध्यक्ष शांताराम चेचरे, सतीश गिरमे, संजय सुरडकर, संतोष बोर्डे, किशोर गिरमे, आप्पासाहेब चेचरे, शांताराम चेचरे, राजेंद्र गिरमे, राजेंद्र इनामके, अण्णासाहेब चेचरे, रावसाहेब चेचरे, संजय चेचरे, भारत चेचरे, राहुल चेचरे, संपत चेचरे, शरद चेचरे, रामनाथ चेचरे, भाऊसाहेब चेचरे, बाळासाहेब दरंदले, ग्रामसेविका कविता आहेर, कैलास वांगे, राजेंद्र चेचरे, शिवाजी चेचरे, सोपान चेचरे, कादर शेख, राहुल पारखे आदींनी सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन केले आहे.