संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
लोणी ः राहाता तालुक्यातील लोणी येथील चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील आरोपींना पकडले. या आरोपींकडून 2 लाख 20 हजार रू. किंमतीचे मुद्देमाल एलसीबीने जप्त केला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव, पोकॉ अतुल लोटके, फुरकान शेख, अमृत आढाव, प्रशांत राठोड, श्रीरामपूरचे मनोज गोसावी, रमीझराजा अत्तार यांच्या टीमने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कोल्हार ते बेलापूर रोडवर, प्रथमेश ग्रो, कोल्हार, ता.राहाता येथे सापळा लावून दोन संशयीत इसम मोटार सायकलवर आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव साहिल उर्फ मिंडा बाबासाहेब पिंपळे (वय 26, रा.अशोकनगर, श्रीरामपूर), अजय संजय पंडीत (वय19, रा.निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता अ सचिन ईश्वर भोसले याचेकडून 1 लाख 40 हजार रू. किंमतीचे सोन्याचे दागिने, तर अजय संजय पंडित याचेकडून 80 हजार रू. किंमतीची दुचाकी असा एकूण 2 लाख 20 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी लोणी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहे.