संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमवारी (दि.१२ डिसेंबर) सकाळी ९ वा भगवानगड फाटा ते हाॅटेल विजयपथ पर्यंत खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रु. द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रु. तिसरे पारितोषिक ५ हजार ५५५ रु. तर चौथे पारितोषिक ३ हजार ३३३ रु. आणि उत्तेजनार्थ १ हजार १११रुपयांचे एकूण ११ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपला मोबाईल नंबर टाकून आधारकार्ड झेरॉक्स प्रत स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८ वा.उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धा आयोजक दत्ता बडे पा.यांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे, खासदार सुजय विखे पा., खासदार प्रितम मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे या उपस्थित राहणार आहेत.