लग्नात बॅग, पर्स चोरी करणारा अल्पवयीन आरोपी रोख रकमेसह ताब्यात ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई

लग्नात बॅग, पर्स चोरी करणारा अल्पवयीन आरोपी रोख रकमेसह ताब्यात ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : येथे लग्न समारंभात बॅग, पर्स चोरी करणारा अल्पवयीन आरोपीस रोख रकमेसह ताब्यात घेण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात व अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, फुरकान शेख, सागर ससाणे, अमृत आढाव व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 3 जुलै 2024 रोजी सिल्व्हर ओक लॉन्स (शिर्डी, ता. राहाता) येथील रिसेप्शना वेळी पुतणी या हातातील पर्स बाजूला ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या. त्यावेळी एक अनोळखी मुलाने पुतणीची ८ लाख ५० हजार रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली, या किसनलाल बाबुलाल कोठारी (रा. बोलठाण, ता. नांदगांव, जिल्हा नाशिक) यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३९२/२४ भारतीय न्याय संहिता क. ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यानंतर एसपी ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सूचना देऊन पथक रवाना केले. एलसीबी टिम’ने सिल्व्हर ओक लॉन्स (शिर्डी, ता. राहाता) येथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. तसेच रिसेप्शन वेळी कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग व फोटो ग्राफर यांच्याकडील व्हिडीओ शुटींग व फोटो तपासले असता एक गो-या रंगाचा मुलगा बॅग उचलून घेऊन जातांना दिसून आला. एलसीबी टिम’ने फुटेज सोशलमिडीयाव्दारे तसेच गुप्तबातमीदारांना पाठविले होते. एलसीबी टिम’ने दि.१३ जुलै २०२४ रोजी संशयीत मुलाचा शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गो-या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेऊन पत्रकार चौकाकडून तारकपुर बसस्थानकाकाडे पायी जात आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने एलसीबी टिम’ने लागलीच तारकपूर रस्त्याने जाऊन पहाणी करता एक १४ ते १५ वर्षे वयाचा गो-या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला. त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करता तो अल्पवयीन (विधीसंघर्षीत) असल्याचे निष्पन्न झाले. अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळून आली. रोख रकमेबाबत त्याच्याकडे विचारपुस करता त्याने मागील १० ते १२ दिवसांपूर्वी शिर्डी येथील लग्नातून चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने विधीसंघर्षीत बालकास ४५ हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!