पुर्नविवाह करण्यास इच्छुक असलेल्या विवाहितेवर 4 वर्ष अत्याचार, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ः कोपरी (जि.ठाणे) गुन्हा दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी / ठाणे ः ः विवाह जुळविणार्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख निर्माण झालेल्या तरूणाने पुर्नविवाह करण्यास इच्छुक असलेल्या विवाहितेवर चार वर्ष अत्याचार केला. त्यानंतर विवाहास नकार दिल्याने विवाहाचे आमिष दाखविणारा मुकुंद भानुदास बिडवे (वय 42, रा.नांदुर्खी, ता.राहाता) याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील एका विवाहितेच्या पतीने 2017 मध्ये दुसरा विवाह केला. तिला ही बाब समजल्यावर तिने पतीला घटस्फोट देण्याचे ठरविले. विवाह जुळविणार्या एका संकेतस्थळावर 2020 मध्ये पुर्नविवाह करण्यासाठीची माहिती दिली. या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे मुकुंद बिडवे (रा.नांदुर्खी, ता. राहाता) याने या विवाहितेशी संपर्क साधला. दोन्ही घरच्यांशी संपर्क साधून विवाह करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर मुकुंद बिडवे याने कोपरी (जि.ठाणे) येथे एक घर स्वतःच्या नावावर भाड्याने घेतले. त्या ठिकाणी तो नियमित येत असे तसेच नाशिक, शिर्डी, कोल्हापूर, कराड (जि.सातारा) या ठिकाणी घेऊन वेगवेगळ्या लॉजवर अत्याचार केला. त्यानंतर विवाहास नकार दिला. तसेच अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरी (जि.ठाणे) पोलिस ठाण्यात मुकुंद बिडवे याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.