संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी ः राहुरी येथील न्यू भरत हॉटेलमध्ये सुरु असणार्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला, या छाप्यात दोघांवर गुन्हे दाखल केले असून, तीन महिलांची सुटक करण्यात आली. विक्रम सुरेश विशनानी (वय 27, रा.तनपुरेवाडी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर), फराद अहमद सय्यद (वय 38, रा.राहुरी, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) यांच्यावर पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ‘अहिल्यानगर एलसीबी’व राहुरी पोलीसांनी संयुक्त केली.
एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोकॉ संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, सारीका दरेकर, रणजीत जाधव आणि राहुरीचे पोनि संजय ठेंगे यांच्या टीमचे पोकॉ एकनाथ आव्हाड, विकास साळवे, जालींदर साखरे यांच्या संयुक्त टीमने ही कारवाई केली.
तपासी टीमने न्यू भरत हॉटेल (राहुरी) येथे चालणार्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता बनावट ग्राहक म्हणून पाठविले. तपास टीमने हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याबाबत खात्री झाल्यावर पंचासमक्ष हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमधील विक्रम सुरेश विशनानी यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली, या दरम्यान त्याच्या ताब्यातून 20 हजार रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 21 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. विक्रम सुरेश विशनानी याचेसह हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये 3 महिला मिळून आल्या. त्या महिलाकडे विचारपुस करता त्यांनी आम्हास वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधून आम्हास पैस देतात. आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणार्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगितली. पोलिसांनी त्या महिलांची सुटका केली. दोघांविरूध्द एलसीबीचे मपोकॉ सारीका दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं 1102/2024 स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3,4,5,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.