राहाता बाजार समिती : १५ जागांसाठी दुरंगी लढत ; ३१ उमेदवार रिंगणात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहाता : राहाता बाजार समितीच्या अर्ज माघारीच्या कालच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. विखे पाटील यांच्या गटाच्या हमाल मापाडी मतदार संघातील १ जागा व व्यापारी मतदार संघाच्या २ जागा बिनविरोध झाल्या. सत्ताधारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळात व विरोधी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडी शेतकरी परिवर्तन मंडळात मंडळाच्या १५ जागांसाठी दुरंगी लढत होत आहे. १ अपक्षही असे एकूण ३१ जण निवडणूक रिंगणात आहेत.


शेतकरी प्रतिनिधी, सहकारी संस्था (सर्वसाधारण मतदार संघ) जनसेवा मंडळ - आण्णासाहेब कडू, विजय उर्फ राजेंद्र बाबुराव कातोरे (जनसेवा मंडळ), सार्थक सचिन कोते, बाळासाहेब खर्डे (मविआ), संतोष गोर्डे (जनसेवा), जगन्नाथ गोरे (मविआ), दत्तात्रय गोरे (जनसेवा), बबन लक्ष्मण नळे (मविआ), बाबासाहेब पोपटराव (जनसेवा), ज्ञानेश्वर गोंदकर(जनसेवा), ज्ञानदेव चौधरी (मविआ), उत्तमराव मते शिरसाठ (जनसेवा), विठ्ठल शेळके (मविआ),नितीन सदाफळ (मविआ). असे या मतदार संघात ७ जागांसाठी १४ जण रिंगणात आहेत.
📥महिला मतदार संघ- अनिता गोर्डे (मविआ), लता चव्हाण (मविआ), मीना निर्मळ (जनसेवा), रंजना लहारे (जनसेवा)
📥इतर मागास प्रवर्ग - दिलीप गाडेकर (जनसेवा),
आण्णासाहेब वाघे (मविआ).
📥विमुक्त जाती भटक्या/ विशेष मागास प्रवर्ग- सुनील थोरात - (माविआ), राजेंद्र भागवत धुमसे (जनसेवा).
📥शेतकरी प्रतिनिधी- ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण- जालिंदर गाढवे (जनसेवा), विजय चौधरी (मविआ), राहुल धावणे (जनसेवा), शरद भदे (मविआ), भास्कर मोटकर (अपक्ष).
📥अ. जाती जमाती सुभाष गायकवाड (जनसेवा), रमेश बनसोडे (मविआ). अर्थिकदृष्ट्या दुर्बल शांताराम जपे (जनसेवा), श्रीकांत मापारी (मविआ).
बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांत हमाल मापाडी मतदार संघ - बाबासाहेब कांदळकर (जनसेवा मंडळ).
📥व्यापारी मतदार संघ - सचिन फकिरा कानकाटे, निलेश बावके (दोघे जनसेवा मंडळ) हे तीन जागा बिनविरोध झाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!