राष्ट्रसंत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त बचतगटांना सामजिक विषयावर जनजागृती व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
श्रीरामपूर- 
येथील सहकार भुवन (आमदार कार्यालय ) येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बचत गटातील महिलांसाठी सामजिक विषयावर जनजागृती व आर्थिक साक्षरता प्रशिक्षण व संविधान दिनानिमित्त संविधान साक्षरता कार्यक्रम पार पडला.

यावेळी  प्रमुख उपस्थिती आमदार लहुजी कानडे, अशोक कानडे,  जिल्हा समन्वयक आधिकरी  संजय गर्जे,  दिलावर सय्यद बार्टी, महेश अबुज , एजाज पिरजादे, रजत अवसक, वंदनाताई मुरकुटे पंचायत समिती सभापती प्रसाद बानकर , उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  दीपप्रज्वलन करुन संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गर्जे यांनी माविमच्या योजनेबाबत माहिती दिली. एजाज पिरजादे सर यांनी बार्टीबाबत माहिती दिली. महिलांना मार्गदर्शन करताना आ. लहुजी कानडे यांनी स्त्री पुरुष समानता, संविधानाची महत्त्व, कायदेविषयक माहिती तसेच बचत गटाचे महत्व याबाबत सखोल माहिती दिली.  बचतगट हे महिलांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. बचत गटामुळे महिला आर्थकदृष्टया स्वावलंबी होऊ शकतात व महिलांची गरिबीतून मुक्तता होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली.तसेच महिलांचे हिंसाचार, व त्याबाबतचे कायदे याबाबत ही माहिती दिली. व त्याचप्रमाणे संविधानाचे वाचन करून त्याचा अर्थ समजावून सांगितला, व महिलांना बचत गट चलवण्याबाबत व फायनान्स कंपनीच्या विळख्यातून बाहेर पडण्याबाबत मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे मा .श्री संजय गर्जे सरांनी महिलांना मार्गदर्शन करताना बचत गटाचे महत्व व जेंडर विषयक माहिती दिली त्याच प्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान राबविण्याबाबत माहिती देऊन कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. एचडीएफसी बँक मार्फत 2 गटना 54 लाख 3 हजार धनादेश वाटप करण्यात आले. महिलांना आर्थिक साक्षरता पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  भरती देशमुख, संगीता ठोबरे, कल्पना काळे, प्रतिभा दंडवते यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!