संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा.यांच्या ३१ व्या पुण्यस्मृती दिनाच्या निमित्ताने श्री तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्ड,श्री तिलोकरत्न आनंद मानवसेवा केंद्र यांच्या विद्यमाने व अहमदनगर मर्चन्टस को.ऑप.बँक.लि.यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन भक्तनिवास येथे मर्चन्टस बँकेचे चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या हस्ते परमपूज्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .
याप्रसंगी आम.संग्राम जगताप श्री तिलोकरत्न स्थानकवासी जैन धार्मिक परीक्षा बोर्डाचे अध्यक्ष नेमीचंदजी चोपडा-पाली (राजस्थान ) नगरसेवक विपुल शेटीया, नगरसेवक प्रकाश भागानगरे, महानगरपालिकेच्या महिला व बचत कल्याण समितीच्या सभापती नगरसेविका मीनाताई चोपडा, बँकेचे व्हॉ.चेअरमन अमित मुथा, नगरसेवक मनीष साठे, मर्चन्टस बँकेचे संचालक सर्वश्री आनंदराम मुनोत, संजय बोरा, अनिल पोखर्णा, संजय चोपडा, श्रीमती मीनाताई मुनोत, श्रीमती प्रमिलाबाई बोरा, सुभाष बायड, संजीवजी गांधी, किशोर गांधी, विजय कोथिंबीरे, सुभाष बायड, कमलेश भंडारी, किशोर मुनोत ,पारस उद्योग समूहाचे संचालक पेमराज बोथरा, संतोष बोथरा, सतीश बोथरा, बँकेचे मुख्य कार्य.अधि.शशिकांत पुंडलिक, अतिरिक्त मुख्य कार्य,अधिकारी नितीन भंडारी आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या शुभारंभाच्या सुरवातीला महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनरुषीजी महाराज .प.पु.अलोकऋषीजी महाराज यांनी मांगलिक,मंगलपाठ(शुभ संदेश )देऊन या स्तुत्य उपक्रमास शुभआशीर्वाद दिले. प्रास्तविक व स्वागत डॉ.विजय भंडारी यांनी केले व या भव्य अश्या रक्तदान शिबिराचे हे २७ वे वर्ष असून या पुण्यकार्य सातत्याने सुरु राहण्यासाठी अ.नगर मर्चन्टस को.ऑप.बँकेचे मोलाचे असे सहकार्य व प्रायोजकत्व मिळत आहे. त्याबद्दल आभार व्यक्त केले. आजपर्यंत या २७ वर्षात सुमारे २७ हजार सर्व समाजातील स्त्री -पुरुषांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. हजारोंना जीवनदान यातून मिळाले आहे. त्या सर्व रक्तदात्यांना त्यांनी धन्यवाद दिले.
आ. संग्राम जगताप यांनी या रक्तदान शिबिराच्या महायज्ञाच्या आयोजकांचे व या पुण्यकार्यासाठी प्रायोजकत्व देणाऱ्या अ.नगर मर्चन्टस कॉ.ऑप.बँकेच्या सर्व संचालकांना धन्यवाद दिले.आचार्य सम्राट.प.पू. आनंऋषीजी महाराजांना अभिप्रेत असलेल्य्या मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे पुण्यकार्य अश्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सुरु असून हे असेच कायम सुरु राहो, यासाठी सर्वोतोपरी सहकार्याची भावना व्यक्त केली.या रक्तदान शिबिरामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मोट्या संख्येनेव उदात्त अश्या भावनेने सहभागी होतात ही बाब उल्लेखनीय असून तेही या मानवसेवेच्या कार्यातील महत्वाचे घटक असल्याचे सांगून त्यांना धन्यवाद दिले. आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजीं महाराज यांचे समाधी स्थळ नगरमध्ये आहे. हे नगरकरांचे परमभाग्य असून विविध विकासात्मक, धार्मिक संस्कारमय कार्यक्रमाचे आयोजन येथे सातत्याने होत असते त्याबध्दल समाधान व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
हस्तीमलजी मुनोत यांनी बोलताना सांगितले की, मर्चन्टस को.ऑप.बँक हि या मानवसेवेच्या कार्यास या उपक्रमास सुरवातीपासूनच पुढाकार घेत आलेला असून यापुढेही अश्या लोकउपयोगी कार्यास सर्वेतोपरी सहकार्य करत राहील असे आश्वासन दिले. आनंदराम मुनोत यांनी आभार व्यक्त केले .
या शिबिरासाठी विजय पितळे, गौतम बोरा, शरद मुनोत, रमेश पितळे सागर गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.