रामवाडीचे गावठी कट्टा बाळगणा-या तिघे जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या तिघांना पकडण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे. अनिस जाकीर शेख, अवेज फकीर मोहम्मद सय्यद, सोहेल युनुस शेख (तिघे रा. रामवाडी, सर्जेपुरा, ता. जि. अहिल्यानगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोउपनि योगेश शिंदे, चंद्रकांत माळोदे, पोहेकॉ दीपक शिंदे, रवि टकले, रघुनाथ कुलांगे, पोकॉ. समीर शेख, प्रमोद लहारे, अमोल आव्हाड, वैभव झिने आदींच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अंमलदार भिंगार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना माहिती मिळाली. तिघेजण केंद्रीय विद्यालय, भुईकोट किल्ल्याजवळ विनानंबरच्या सुझुकी दुचाकीवर संशयीतरित्या थांबलेले आहेत. आता गेल्यास मिळून येईल. ही माहिती सपोनि जगदीश मुलगीर यांना देण्यात आली. सपोनि श्री मुलगीर यांनी खात्री करुन कारवाई करण्याबाबत भिंगार कॅम्प तपासी टीमला दिले. अंमलदार यांनी माहिती ठिकाणी दोन पंचासह जाऊन खात्री केली. या दरम्यान तिघेजण केंद्रीय विद्यालयाचे परिसरात एका विनानंबरचे चॉकलेटी रंगाची सुझुकी कंपनीची बर्गमॅन दूचाकीवर बसून फिरताना दिसले. त्यावेळी त्यांना थांबण्याचा ईशारा केला. यावेळी ते न थांबता पळून जात असताना त्यांचा पेट्रोलिंग पथकातील अंमलदारांनी पाठलाग करुन त्यांच्यावर झडप घालून पकडून त्यांच्याकडील गाडीचे डिक्कीची झडती घेतली. त्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं. ७६२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,७ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.