संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज(सोमवार)पासून सुरूवात झाली आहे. परंतु राज्यसभेत गोंधळ घातलेल्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबीत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ज्यांना संसदेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत घातलेल्या गोंधळामुळे राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. ११ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यसभेत गोंधळ झाला होता. काँग्रेस, टीएमसी आणि शिवसेनेच्या खासदारांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.
या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या खासदारांचं समावेश आहे. तसेच यामध्ये प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई आणि अखिलेश प्रताप सिंग यांचा समावेश आहे. सभागृहाचे कामकाज आता ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब देखील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या खासदारांचं निलंबन हे चालू सत्राच्या उर्वरीत भागासाठी करण्यात आलं आहे.
१२ खासदारांमध्ये एलामरम करीम (सीपीएम), फूलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा(काँग्रेस), रिपून बोरा(काँग्रेस), बिनय विश्वम(सीपीआय), राजमणी पटेल(काँग्रेस), डोला सेन(टीएमसी), शांता छेत्री(टीएमसी), सैयद नासिर हुसैन(काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी(शिवसेना),अनिल देसाई(शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंह(काँग्रेस), अशा एकूण १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
११ ऑगस्ट रोजी इन्शूरन्सच्या बीलावर राज्यसभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु संसदेत मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना गोंधळ देखील घालण्यात आला होता. त्यामुळे हा गदारोळ रोखण्यासाठी मार्शलांना बोलावण्यात आलं होतं. परंतु त्यावेळी झालेल्या अधिवेशनात राज्यसभेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी सांगितलं की, जे काही संसदेत झालं आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मंदीराला तुम्ही अपवित्र करून टाकलं आहे.
दरम्यान, आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात झाली असून हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार २६ विधेयकं मांडणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी सहकार्य करावं, अशा प्रकारचं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून करण्यात आलं आहे.