राज्यपाल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मान्यता देतील : ना. थोरात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई-
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. मात्र ही प्रतिक्षा लवकरचं संपणार आहे. कारण राज्य सरकारच एक शिष्टमंडळ आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते.

या भेटीनंतर राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मान्यता देतील याची खात्री असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. नगरविकास मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज  राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचले होते.
संदर्भात बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनुसार राज्यपालांना दिला आहे. त्यामुळे राज्यपालांनी ही शिफारस मान्य करावी याची विनंती करण्यासाठी छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आम्ही गेलो होतो. त्यांना हा कार्यक्रम जाहीर करण्याची मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.”निवड कार्यक्रम बदलाबद्दल फार काही विचारणा केलेली नाही. बदल केलेत ते लोकसभेत जी पद्धत तीच पद्धत महाराष्ट्र विधानसभेकरिता केलेली आहे. विधान परिषदही त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे चुकीचं काही केलं असं नाही. त्यांना फक्त काही अभ्यास करायचा आहे माहिती घ्यायची आहे ती घेऊन राज्यपाल कळवतो असं म्हटले आहेत. १२ आमदारांच्या निवडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र राज्यपाल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीची काही माहिती घेऊन मान्यता देतील अशी खात्री आहे. काही अडचण नाही निश्चित मान्यता देतील, बिगर अध्यक्षाचं कसं विधानसभा ठेऊ शकतात. ही फार अवघड प्रोसेस नाही एका फोनवर आम्हाला नाव समजेल आणि आम्ही नॉमिनेशन करु.”
यावर मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे पत्र दिले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. ही निवडणूक उद्याच्या दोन दिवसांत व्हावी कारण विधानसभेला कायम अध्यक्ष असणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नियमानुसार आम्ही राज्यपालांना ही मागणी केलेली आहे. य़ावर राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका दर्शवली, त्यांनी एवढचं म्हटलं की, याबाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो त्यामुळे निर्णयाची अपेक्षा आहे.”
हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी अध्यक्षपदाची घोषणा केली जाईल. यासाठी उद्या आणि परवा आवाजी पद्धतीने मतदान पार पडणार आहे. परंतु विधानसभेच्या अधिवेशनात विधासनभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाने केली जाते. मात्र यंदा ही निवड आवाजी पद्धतीने घेण्यात यावी असा बदल नियमात केला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत अध्यक्ष किंवा उपसभापती यांची निवड आवाजी मतदानानेच केली जाते. विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार सरकारला असतो मात्र त्याला राज्यपालांची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे राज्यपाल यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
 
 
 
 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!