संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी :- महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे अहमदनगर जिल्हयातील दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. आगमनानंतर राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांनी श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी राज्यपाल महोदयांचे आगमनप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थानचे विश्वस्त सर्वश्री श्रीमती अनुराधा आदिक, अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यावेळी उपस्थित होते.