👉अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : गेल्या वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भुकंप झाला होता. दि.30 जून 2022 या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने दोन दिवसांपूर्वी वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर आता (दि.2 जुलै) पुन्हा एकदा राजकारणात भुकंप झाला असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थनातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. (Political , NCP leaders including Ajit Pawar)
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मारावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकारणाच्या राजकारणातील ही आजच्या घडीतील सर्वात मोठी घटना मानली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आदिती तटकरे या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.