संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Ahmednagar – राज्यात आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून जोरदार राजकारण सुरू आहे. ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या सर्व प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दुसरीकडे दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे. हे राज्याचे दुर्दैव आहे. हे सर्व महाराष्ट्रात कोण आणते असा प्रश्न विचारला जात नाही. याला आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
फडणवीसांनाही अप्रत्यक्ष टोला
दरम्यान, सरकार पडण्याची विरोधकांनी वाट पाहून नये, तर असे कार्य करावे की ज्या कार्याची दखल घेऊन जनता आपोआपच सत्ताधाऱ्यांकडे पाठ फिरवून तुम्हाला निवडून आणेल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.