संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे, याविषयावर यावर प्रतिक्रिया देताना दै.सामनाचे संपादक तथा शिवसेना खा. संजय राऊत यांनी ई़़डीच्या कारवाईचा निषेध करत ईडीने अयोध्यातील मंदिर घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे असे म्हटलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, राष्ट्रवादीने संजय राऊत यांना सुपारी दिली असून ती सुपारी ते वाजवत आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगवला आहे. तसेच ईडीने केलेली कारवाई ही आणीबाणीसारखीच असल्याचं सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलं होतं यावरही देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.
अयोध्येची चौकशी करणं गरजेचं ईडीने ती चौकशी करावी असा प्रश्न फडणवीसांना करण्यात आला यावर त्यांनी म्हटलं आहे की, संजय राऊत यांना राष्ट्रवादीनं सुपारी दिली आहे. तीच सुपारी ते वाजवत असतात. संजय राऊत यांना अयोध्येबाबत बोलण्याचा अधिकारी आहे का? अयोध्येबाबत बोलण्याबाबत त्यांचे काही सहकार्य आहे का? केवळ तोंडाची वाफ दडवली, अयोध्येच्या संदर्भात खरी लढाई लढणारे आम्ही आहोत आणि अयोध्येच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मोदींनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. यामुळेच आज मंदिर बनत आहे. हे मंदिर बनत असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखतंय आणि ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्या ओठात येतंय असा टोला संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई सुरु आहे त्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन यासंदर्भात सगळी चौकशी सीबीआयला सोपवली आहे. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात येणारी कारवाई न्यायालयाने निर्देशित करण्यात आलेली आहे. याचा कोणताही राजकीय अर्थ काढायची गरज नाही आहे. तपास यंत्रणा काम करत आहेत त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याचं काही कारण नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सीबीआय ज्यावेळी एखाद्या ठिकाणी छापेमारी करते तेव्हा लोकल पोलिसांऐवजी सीआरपीएफ त्यांच्या सोबत असतात असा त्यांच्या प्रोटोकॉल आहे. त्यामुळे सीआरपीएफ का आणले किती आणले याबाबत काही बोलू शकत नाही कारण मी त्यांचा प्रवक्ता नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आणीबाणी पाहिलेली नाही त्या लहान होत्या आम्हीही लहा होतो पण त्यांनी आणीबाणी भोगली नाही. २१ महिने कोणताही आरोप नसताना माझे वडील तुरुंगात होते असे अनेक लोकं होते. जॉर्ज फर्नांडीस सारख्या व्यक्तीला बर्फावर झोपवण्यात आलं होते. काय तुम्हाला माहिती आणीबाणीविषयी? तुम्हाला माहिती नसेल म्हणून बोलत असाल असा टोलाही फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.