युवा सेनेच्या नवीन पदाधिकार्‍यांचे नियुक्तीपत्र

पदाच्या माध्यमातून युवकांना पाठबळ देण्याचे काम -विक्रम राठोड
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- 
युवासेनेने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी युवा सेना पुढाकार घेत आहेत. समाजात चांगले काम होत असल्याने अनेक युवकांना पक्षाविषयी मोठे आकर्षण आहे. त्यामुळे अनेक युवक पक्षाशी जोडले जात आहेत. या युवकांना पदाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यास पाठबळ देण्याचे काम युवासेना प्रमुख ना.अदित्य ठाकरे, सचिव वरुन सरदेसाई, नगर जिल्हासंपर्क प्रमुख संजय साटम यांच्यावतीने करण्यात येत असते. आज नियुक्त झालेले पदाधिकारी हे आपआपल्या भागात चांगले काम करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवित आहेत. त्याचबरोबर पक्षाशी अनेकांना जोडण्याचे काम केले आहे. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून ते आणखी जोमाने काम करुन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करतील आणि भविष्यात जिल्हा भगवामय होईल, अशी ग्वाही युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

  युवा सेनेच्या नवीन पदाधिकार्‍यांचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, उप जिल्हाप्रमुख अविनाश कोतकर, शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, शिक्षक सेना अध्यक्ष प्रा.अंबादास शिंदे, ओंकार खेवरे,  गौरव ढोणे आदि उपस्थित होते. यावेळी नगर तालुकाध्यक्षापदी संदेश शिंदे, राहुरी तालुकाध्यक्ष रोहन भुजाडी, विधानसभा संघटक नगर-श्रीगोंदा अविनाश गव्हाणे, नगर-राहुरी संघटक गणेश खेवरे, नगर-राहुरी संघटक शिवराज काळे, पारनेर तालुका उपप्रमुख संकेत पवार, नगर तालुका उपप्रमुख वैभव ढगे, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबा शेरकर आदिंची नियुक्ती करुन मान्यवरांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
     याप्रसंगी अविनाश कोतकर म्हणाले, युवा सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आग्रही राहिलो आहोत. यासाठी स्व.अनिलभैय्या राठोड यांनी नेहमीच पाठबळ देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी युवकांचे संघटन महत्वाचे आहे. युवा सेनेच्या झेंड्याखाली युवक एकत्र येऊन पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सुटत आहेत. आता मिळालेल्या पदामुळे जबाबदारी वाढली आहे. या माध्यमातून आणखी चांगले काम करु, असे सांगितले.
     तसेच नुतन पदाधिकारी संदेश शिंदे, रोहन भुजाडी, अविनाश गव्हाणे, गणेश खेवरे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
     यावेळी सुरज शिंदे, नितीन शेळके, अभि कवडे, शुभम खंडागळे, विवेक गायकवाड, संग्राम केदार, अदित्य धावडे, भरत ठाणगे, अतिष आजबे, पंकज भोपळे आदिंसह तालुक्यातून आलेले युवा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंबादास शिंदे यांनी केले तर आभार शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!