संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व स्वराज्य कामगार सेनेचे योगेश गलांडे यांनी खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे सचिव संजय जी मोरे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, तालुकाप्रमुख विकास रोखले, तालुकाप्रमुख नंदू ताडे आदी उपस्थित होते.
दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी आकाश कातोरे यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड केली. तर योगेश गलांडे यांची अहमदनगर युवासेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.