युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने प्लॅन-बीवर काम सुरू

रशियातील भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक, NSA आणि 5 मोठे मंत्री सहभागी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. त्यामुळे तेथील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले असून, त्यामुळे भारतीय नागरिकांना एयर लिफ्ट करण्यासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानालाही मार्गावरून परतावे लागले आहे. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने प्लॅन-बीवर काम सुरू केले आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, कॅबिनेट सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत.
दुसरीकडे युक्रेनमधील भारतीय नागरिक सीमा ओलांडून हंगेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी हंगेरीतील भारतीय दूतावासाचे एक विशेष पथक युक्रेन सीमेवरील जोहानाई येथे पाठवण्यात आले आहे. तिथे येणाऱ्या भारतीयांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ही टीम मदत करेल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी आज रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलू शकतात.
👉दोहा, कतार येथील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की भारत-कतार द्विपक्षीय हवाई करारानुसार, भारत सरकारने युक्रेनमधून येणाऱ्या भारतीय प्रवाशांना येथून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
👉आम्ही येथील प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असे युक्रेनमधील भारताचे राजदूत पार्थ सत्पथी यांनी म्हटले आहे. भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास आपल्या नागरिकांना येथून (युक्रेन) कसे बाहेर काढता येईल हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक भारतीय आपल्या देशात परत येईपर्यंत भारतीय दूतावास येथे काम करत राहील

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!