.. या वक्तव्यावरून इंडियन मेडिकल असोसिएनची बाबा रामदेव यांना कायदेशीर नोटीस
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा
नवीदिल्ली-कोरोनामुळे मृत्यू होण्याचे कारण अॅलोपॅथी असल्याचा दावा योग गुरू बाबा रामदेव यांनी केला. या वादग्रस्त वक्तव्यामुळे बाबा रामदेव यांच्यावर सध्या टीका होत आहे. बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून इंडियन मेडिकल असोसिएनकडून बाबा रामदेव यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. यासंदर्भात आयएमने प्रसिद्ध पत्रक देखील जारी केले होते. पण आता आयएमने कायदेशीर नोटीस बाबा रामदेव यांना बजावली आहे.
अॅलोपॅथीच्या औषधांविरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्यावर तसेच ‘अॅलोपॅथी’ आणि आधुनिक औषधांचा अभ्यास करणाऱ्या प्रशिणार्थी/ डॉक्टरांच्या प्रतिष्ठेचे नुकसान झाल्यामुळे आयएमने बाबा रामदेव यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीच्या माध्यमातून त्वरित लेखी स्वरुपात माफी मागण्याची मागणी केली असून जर असे केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
बाबा रामदेव काय म्हणाले…
रेमडेसिवीर, अॅन्टीबायोटिक, प्लाझ्मा थेरपी बॅन झाले, फॅव्ही फ्लू हे सगळं अपयशी ठरत आहे. तापाच कोणतही औषध उपयुक्त ठरत नाही. त्या व्हायरस, बॅक्टेरियाला, फंगसला ज्या कारणाने संसर्ग होत आहे त्यावर औषध देण्यात येत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अॅलोपॅथिचे औषध खाल्याने झाले आहेत. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले असल्याचे अतिशय धाडसी वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. मी खूपच मोठे वक्तव्य करत आहे, या वक्तव्यानंतर या मुद्द्यावर वाद निर्माण होऊ शकतो असेही बाबा रामदेव म्हणाले. स्टेरॉईड्समुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण अॅलोपॅथी आहे. अॅलोपॅथी संपूर्णपणे फेल आहे, असे मी म्हणत नाही. त्यावेळी मॉडर्न मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञानाला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण वेगवेगळे प्रयोग आणि त्याचे निष्कर्षावर त्यांनी बोट ठेवले.