या आधी मला गोपीनाथाचा आशिर्वाद तर, आज गहिनींनाथाचा आशिर्वाद मिळाला : उपमुख्यमंत्री फडणवीस

👉भाविकांमध्ये माजीमंत्री पंकजाताईची गहिनीनाथ गडावर अनुपस्थितीची चर्चा सुरू होती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
पाथर्डी –
या आधी मला गोपीनाथाचा आशिर्वाद मिळालेला होता, आणि आज गहिनींनाथाचा आशिर्वाद मिळाला आहे. मी मुख्यमंत्री असताना व पंकजाताई पालकमंत्री होत्या, त्यावेळी आम्ही २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातील २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. नाथांचा संकेत असेल, त्यामुळेच राहिलेला निधी सुद्धा माझ्या हातून मिळावा, यासाठी मला याठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून येता आले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथ गडावर रविवारी (दि.१५) वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्यासह मा.आ.भीमराव धोंडे, आ.बाळासाहेब आजबे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजीमंत्री सुरेश धस आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री फडणवीस म्हणाले, मी मुबंईला अरबी समुद्र पहिला आणि इथे आल्यावर हेलिकॉप्टरमधून भक्तांचा महासागर पहिला आहे. आदरणीय बाबांनी माझ्यावर वामनभाऊंचा फोटो असलेला भगवाध्वज देऊन जी जबाबदारी दिली आहे. ती मी बाबांचा व गडाचा सेवेकरी म्हणून काम करेन.खरंतर मी आज परदेशी दौऱ्यावर जाणार होतो. परंतु वामनभाऊंची इच्छा होती, की मी आज यावे त्यामुळे मला आज दर्शन घेण्याचा योग जुळून आला. असे सांगत असतानाच ते म्हणाले, यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होत. परंतु त्यांना परदेशी दौऱ्यावर जायचे असल्याने त्यांना येता आले नाही.
यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी धर्मांतर या ज्वलंत प्रश्नांकडे उपमुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. “आपली आई ही माझी आई आहे.,हे सांगणे गुन्हा नाही.” आपण धर्म कार्य करत राहावे. हा समाज आपल्याला आशिर्वाद देईल. देवेंद्र यांना आपण खरेतर लोकेंद्र म्हणायला हवे, असेही विठ्ठल महाराज यांनी यावेळी आवर्जून म्हटले.
यावेळी आरएसएसचे प्रांत कार्यवाह दादाजी इधाते, समरसता मंचचे निलेश गद्रे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माजीमंत्री आ.सुरेश धस, मा.आ.भीमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, मा.आ.दरेकर, पत्रकार विलास बडे, राजेंद्र म्हस्के, डॉ तुकाराम नेहरकर आदी उपस्थितीत होते.
यावेळी प्रकर्षाने दरवर्षी न चुकता या कार्यक्रमास उपस्थिती राहणाऱ्या माजीमंत्री पंकजा मुंडे, बीड खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र या कार्यक्रमाकडे सोयीस्कर पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत.
दरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून गडासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी उपमुख्यमंत्र्याकडे केली.
भाऊंचे पुणे येथील भक्त डॉ. नेहरकर यांनी हेलीकॉप्टरमधून समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करून वामनभाऊंच्या समाधी दर्शन घेतले. यावेळी लाखों भाविकांनी राज्यभरातून गहिनीनाथ गडावर
सोहळ्यास उपस्थित लावली होती. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने गहिनीनाथ गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संकलन : सोमराज बडे, पाथर्डी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!