…या अन्यायाविरुद्ध कोणी बोलणार आहे का फक्त राजकारण करणार आहात का? : माजी सरपंच संजय बडे पा.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डी – दुर्दैवाने महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन एक जीआर काढला आहे. त्यात असं म्हटल की, ज्या गावातून पावसाचे पाणी पैठण धरणाला (नाथसागर) वाहून जाते. त्या गावात पाणी आडवण्याचे नवीन प्रकल्प करता येणार नाहीत. ही पाथर्डी मतदारसंघाच्या दृष्टीने घातक निर्णय असल्याचे पाथर्डी तालुक्यातील येळीचे माजी सरपंच संजय बडे पा. यांनी म्हटले आहे.
श्री. बडे पा.पुढे म्हणाले की,पाथर्डी तालुक्यातील ज्या गावांमधून पावसाचे पाणी पैठण धरणाला(नाथसागर) वाहून जाते. त्या गावातील लोकांसाठी व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीसाठी आपला तालुका म्हणजे कमी पाऊस पडणारा भाग,आणि त्यामुळेच आपल्या तालुक्याची ओळख दुष्काळी व उसतोडणी कामगरांचा तालुका म्हणून आहे. प्रामुख्याने पाथर्डीच्या पूर्व भागाला कुठलीही जलसिंचनाची,पाण्याची शास्वत व्यवस्था नाही. संपूर्ण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. वर्षा़नुवर्षे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा टॅंकरचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेती करणे तर लांबच, यात एक दिलासा देणार शासनाचा उपक्रम म्हणजे “पाणी आडवा पाणी जिरवा” हे धोरण राबवून या भागात विविध नद्यांवर सिमेंट बंधारे, छोटी मोठी तळी व पावसाचे पाणी आडवण्याचे इतर उपाय करुन, पाणी आडवा. थोड्या फार प्रमाणात पाणी आडवण्याचे काम चालू ठेवले. त्यामुळे हंगामी का होईना शेती करणं शक्य झालं. त्यामुळे एकत्र येऊन पाणी आडवल पाहिजे ही लोकांची मानसिकता तयार व्हायला लागली होती. पंरतु दुर्दैवाने महाराष्ट्रा शासनाने औरंगाबाद हायकोर्टाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन एक जीआर काढला आहे. त्यात असं म्हटल की, ज्या गावातून पावसाचे पाणी पैठण धरणाला (नाथसागर) वाहून जाते. त्या गावात पाणी आडवण्याचे नवीन प्रकल्प करता येणार नाहीत. म्हणजे नदीवर सिमेंट बंधारे, तळे, नाले, नदी खोलीकरण इ.कामे करायची नाहीत. हा कुठला न्याय आहे आहे. आपल्या भागातील शेतक-यांनी काय करायचे. यांना कोणतेही पाणी दयाचे नाही का? या अन्यायाविरुद्ध कोणी बोलणार आहे का फक्त राजकारण करणार आहात का? थोडा विचार करा लोकप्रतिनिधी नां विनंती आहे, असे श्री बडे यांनी म्हटले आहे.
याबद्दल बोला. लोकप्रतिनिधी म्हणजे संरपंचा पासुन ते खासदार मंत्र्यांपर्यंत. सगळ्यांना च आवाहन करतो मित्रांनो वेळीच जागे व्हा, राजकारणासाठी डोळयावर पट्टी बांधू नका. आपण समाजाचे काही तरी देणें लागतो हे लक्षात ठेवा, विचार करा या जुलमी निर्णयाच्या विरोधात एकत्र या व काही तरी करा, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!