म.वि.प.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून चौघांची माघार ; ३६ उमेदवार रिंगणात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी मंगळवारी (दि.११ जून २०२४) चौघांनी आपले दाखल उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. माघार घेणारे उमेदवार संदीप नामदेवराव गुळवे (गावठाण क-हे, ता. संगमनेर, जि.अ.नगर), मुखतार अहमद शेख (रा. मालेगाव, जि.नाशिक), किशोर प्रभाकर दराडे (रा.कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अ.नगर), रुपेश लक्ष्मण दराडे (रा.ता.येवला, जि.नाशिक) आदिंनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे या निवडणुकीत ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
उर्वरित उमेदवार 👉👉 ॲड संदीप गोपाळराव गुळवे (मु.बेलगाव, कु-हे, पोस्ट अस्वली, ता.ईगतपुरी, जि.नाशिक),👉 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दिलीप बाबुराव पाटील ( ता.पारोळा, जि.जळगाव) 👉 इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲड.महेंद्र मधुकर भावसार (देवपूर, धुळे)👉 नेशनलिस्ट काॅंग्रेस पार्टी, भागवत धोंडिबा गायकवाड (कासारे पो.कौठ-कमळेश्र्वर, ता.संगमनेर, जि.अ.नगर) 👉 समता पार्टी,
👉 अपक्ष उमेदवार याप्रमाणे – अनिल शांताराम तेजा ( मु.जाटपाडे, पो.निंबायती, ता.मालेगाव, जि.नाशिक), अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे (मु.पो.देहरे, या.नगर,जि.अ.नगर), अविनाश महादू माळी (नंदुरबार), इरफान मो इसहाक (नादिर, रा.नवापुरा, मालेगाव,जि.नाशिक), भाऊसाहेब नारायण कचरे (पोलिस काॅलनी,पाईपलाईनरोड, सावेडी, अ.नगर), विवेक बिपीनदादा कोल्हे (येसगाव, ता. कोपरगाव, जि.अ.नगर), सागरदादा रविंद्र कोल्हे (मनमाड,ता.नांदगांव, जि.नाशिक), संदीप वसंतदादा कोल्हे (रा.साळसाणे, पो.रेडगाव, ता. चांदवड, जि.नाशिक), गजाननो पंडीत गव्हारे (रा.ता.जामनेर, जि.नाशिक), बाबासाहेब संभाजी गांगुर्डे (रा.श्रीरामपूर, जि.अ.नगर), संदीप वामनराव गुरुळे (रा.मुर्शतपूर,ता.कोपरगाव,जि.अ.नगर), कुंडलिक दगडू जायभाये (रा.पाथर्डी, जि.अ.नगर), सचिन रमेश झगडे (रा.आढळगाव, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर), दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे (रा.घारगाव, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर), दिलीप काशिनाथ डोंगरे (रा.वडगाव लांडगा, ता.संगमनेर,जि.अ.नगर), धनराज देविदास विसपुते (रा.पनवेल, रायगड), निशांत विश्वासराव रंधे (रा.शिरपूर,जि.धुळे), पै.डाॅ.छगन भिकाजी पानसरे (रा.शेवगाव, जि.अ.नगर), सुनिल पांडुरंग पंडित (रा.सावेडी,अ.नगर), नानासाहेब रणजित बोठे (रा.राहाता, जि. अ. नगर), प्रा.भास्कर तानाजी भामरे (नाशिक), महेश भिका शिरुडे (रा.गंगापूररोड, नाशिक), रखमाजी निवृत्त भड (रा.धामोडे, ता.येवला, जि.नाशिक), रतन राजलदास चावला (रा. देवळाली कॅम्प, नाशिक), डॉ.राजेंद्र एकनाथराव विखे पाटील (रा.लोणी, ता.राहाता, जि.अ.नगर), आर.डी.निकम (मालेगाव कॅम्प, मालेगाव, जि.नाशिक) आदि उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.