संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-मोहटादेवी गडावर मोठया प्रमाणात साजरा होणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय.परंतु कोरोना महामारी मुळे दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट असल्याने सर्वच मंदिर बंद आहेत. त्यामुळे मोहटा देवी मंदिरात कोणताही उत्सव साजरा करता आला नाही. आता येणारा नवरात्र उत्सव तोंडावर आला आहे.
त्यामुळे मोहटा देवी देवस्थानामध्ये भाविकांना अनेक निर्बंध घालून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंदिर खुले करण्याबाबत एक प्रशासकीय बैठक गडावर आयोजित केली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या काळात मंदिर उघडणार असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार हि श्यक्यता लक्ष्यात घेऊन.मास्क,सॅनिटायझर चा वापर, सुरक्षित अंतर, तसेच महाप्रसाद भक्तां साठी नसेल तर यावेळी भक्तांना मंदिर परिसरात किंवा भक्तनिवास मध्ये मुक्कामी थांबता येणार नाही. याबाबत मंदिर खुले करण्यासाठी समिती सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रांतधिकारी देवदत्त केकान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुदर्शन मुंडे, तहसीलदार श्री श्याम वाडकर, पोलिस निरीक्षक श्री सुहास चव्हाण ,तसेच मंदिर व्यवस्थापन समिती पदाधिकारी ,सदस्य,कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
👉🏻संकलन -पत्रकार सोमराज बडे
📞९३७२२९५७५७