संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुरबाड – मुरबाड तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात स्वतंत्र्याचा 75 वा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव वर्ष सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा होत असतानाच मुरबाड तालुक्यातील नेहमी चर्चेत असलेले कलमखांडे गावात प्रथमच आज ८८ वर्षांच्या ठमाबाई साबले या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने सर्वत्र मुरबाड तालुक्यात युवा सरपंच चंदू कापडी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने प्रथमच एका वृद्ध महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असावी असे बोलले जात आहे.तसेच यावेळी भालचंद्र खोलांबे, ग्रामसेवक बी घायवट, पोलीस पाटील शंकर कापडी, शिपाई सुरू कापडी, अंगणवाडी शिक्षिका उषाताई, शिक्षक बी पवार,दिपक धुमाळ यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
या अनोखी उपक्रमामुळे कलमखांडे ग्रामपंचायतीने आजच्या दिवशी आदर्श निर्णय घेतल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत कलमखांडे यांचे अभिनंदन होत आहे.
तसेच मुरबाड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अमोल कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर तर तहसील कार्यालयात स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र सैनिकांच्या वारसांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नायब तहसीलदार प्रसाद पाटील, नायब तहसीलदार शंकर कोरवी, मुरबाड पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते तर मुरबाड पंचायत समितीच्या आवारात गट विकास अधिकारी रमेश अवचार यांच्या हस्ते, ध्वजारोहण करण्यात आले.तर मुरबाड नगरपंचायतीच्या प्रांगणात मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले.तर मुरबाड पोलिस ठाण्याचा प्रांगणात मुरबाड पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . अशाप्रकारे स्वतंत्र्याचा 75 वा स्वतंत्र दिन ठिक -ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे.
संकलन : बाळासाहेब भालेराव