दोन्ही पोलिस भाऊ स्थानिक पोलिसठाण्यात कस ? त्यांना कोणाचा अभय यांची सखोल चौकशी व्हावी…
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः टाकळीमानूर दरोडा प्रकरणातील ‘नगर एलसीबी टिम’ने पकडलेला मुख्य आरोपी माजी नगरसेवक तुकाराम पवार याला स्थानिक पोलिसांचे पाठबळ आहे. त्याचे दोन भाऊ पाथर्डी व शेवगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी पवार याच्यावर मोक्का व 307 चे कलम लावण्यात यावेत. त्याच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता कोठून आली, याची चौकशी व्हावी,अशी मागणी दरोड्यातील जखमी बाबासाहेब ढाकणे व शिवसेना िंशंदे गटाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई व्हावी, या मागणीसाठी गुरुवारी पाथर्डी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत घटनेत जखमी झालेले ढाकणे यांचे जावई मारुती खेडकर, राजेेेंद्र नांगरे, अंकुश चितळे, संजय दहिफळे हे उपस्थित होते.
गुरुवारी पाथर्डी बंद ; पोलिस ठाण्यावर मोर्चा
पाथर्डी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी व गुंडगिरी जबरी चोरी दरोडे पाकीटमारी महिलांची मुलींची छेड काढणे, बळजबरीने जागा बळकवणे, बेकायदेशीर सावकारकी, मटका,जुगार, जमिनी हडप करणे,व्यापार्यांना ब्लॅकमेलिंग करणे, यासह विविध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुरुवारी (दि.21 मार्च 2024) पाथर्डी बंदचे आवाहन केले आहे. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी 10.30 वाजता मोर्चास सुुरुवात होणार आहे. मोर्चात पाथर्डी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
बाबासाहेब ढाकणे म्हणाले की, या हल्ल्यातून आपण नशिबाने वाचलो आहे. आपला पुनर्जन्म झाला आहे. येथून पुढील काळात आपण तालुक्यातील गुंडशाही विरोधात काम करणार आहोत. आमच्या जीविताला धोका असून, आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे. या प्रकरणाचा ‘नगर एलसीबी’ने योग्य तपास करत सात आरोपींना पकडण्यात आले असले तरी, ज्या टाकळीमानूरजवळ असलेल्या अंबिकानगर येथे माझ्या घरावर दरोडा पडला. ते टाकळीमानूर बीट हे पवार याचा पाथर्डी पोलिस ठाण्यात काम करत असलेला मोठ्या भावाच्या अधिपत्याखाली आहे. त्याचाही या गुन्हयात समावेश असून,त्याचीही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी चौकशी करावी. आरोपी तुकाराम पवार याचे दोन्ही भाऊ हे पोलिसदलात आहेत. त्यांचेकॉल रेकॉर्ड तपासल्यावर सर्व गोष्टी बाहेर येतील. पवार याच्याकडे शेकडो एकर जमीन व कोटयवधींची मालमत्ता असून ती कोठून आली, याचा शोध घेत त्यांच्यावर मोक्कातंर्गत कारवाई करावी. आरोपींचे सावकारी, बेकायदा दारुविक्री, मटक्याचे धंदे आहेत. किलोभर सोने अंगावर घालून ते फिरतात. अतिक्रमण करून टपर्या टाकणे व भाडेे वसूल करणे हे त्यांचे उद्योग आहेत. आरोपी पवार याचा पोलिस दलात काम करणारा भाऊ टाकाळी फाट्यावर कलाकेंद्र चालवतो. याच कलाकेंद्रावर गुन्हेगार आश्रय घेतात. शहरात झालेल्या गुरसाळी दरोडा व हत्याकांड प्रकरणात याच आरोपींचा समावेश असल्याचा संशय आहे. याचा तपास झाल्यावर अनेक गुन्ह्यांची खरी वास्तवात उघडकीस येईल. पोलिसांनी तपास करावा. यासाठी गुरुवारी पाथर्डी शहर बंद ठेवत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात इशारा ढाकणे यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना संजय दहिफळे म्हणाके की, भरदिवसा माझे घर फोडण्यात आले. आरोपी निष्पन्न होऊनही पाथर्डी पोलिसांनी आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप केला आहे.