मुख्यमंत्री शिंदेंच्या आयोध्या दौर्‍यात भाजपचे प्रा. शिंदेंचा समावेश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
महाराष्ट्र रामराज्य करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार असून, पहिल्यांदा हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आयोध्या दौर्‍यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जाणार आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने 8 एप्रिल रोजी जाणार असून, या दौर्‍यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज आदिं भाजप नेत्यांचा या दौर्‍यात समावेश आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत आयोध्याच्या राम मंदिराच्या कामाची पाहणी करण्यात येणार असून, 9 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आयोध्येतील विविध भागांना भेट देणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर प्रभु श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार असून, या महापुजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्या दौर्‍याची तयार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती. दिवे आगार येथील गणपती मुर्तीच्या चोरी प्रकरानंतर अधिवशेनाच्या कामकाजात शिवसेनेच्यावतीने गणपतीची आरती करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या शिष्टमंडळात शिवसेनेच्या 12 आमदारांसह भाजपाचे आ.राम शिंदे सहभागी होते. त्यामुळे अधिवेशनातील गणपतीच्या आरती वेळी तुम्ही आमच्या सोबत होता. आता आयोध्याच्या राम मंदिरच्या आरतीला भाजपचे राम शिंदे असलेच पाहिजे, असा विशेष अग्रह त्यांनी धरला. आयोध्या दौर्‍यासाठी दि.8 रोजी विशेष विमान जाणार आहे. त्या विमानात राम शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले असून, आ.राम शिंदे मुंबई कडे रवाना झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!