मुख्यमंत्री ना. शिंदेंनी सपत्नीक ‘श्री.साई’ समाधीचे दर्शन घेतले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork ( व्हिडिओ)
शिर्डी-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक बुधवार (दि‌.२३) रोजी दुपारी शिर्डीला भेट देऊन त्यांनी श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथून हेलिकॉप्टरने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर बुधवारी दुपारी आगमन झाले. यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ‌. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते. नामदार एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!