मुकुंदनगर खूनातील आरोपी पुण्यात जेरबंद : ८ तासात भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी

मुकुंदनगर खूनप्रकरणातील आरोपी पुण्यात जेरबंद : ८ तासात भिंगार कॅम्प पोलिसांची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : शहरातील मुकुंदनगर या ठिकाणी चेष्टामस्करी झालेल्या वादातून झालेल्या खून घटनेतील आरोपीस पुणे या ठिकाणीहून ८ तासात जेरबंद करण्याची कामगिरी भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे. शुमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ दिपक शिंदे, संदिप घोडके, पोकॉ. समीर शेख, प्रमोद लहारे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जिलानी मेडिकल (मुकुंदनगर) या ठिकाणी आरोपी शुमशुद्दीन निजामुद्दीन खान व जिशान रुस्तमअली खान असे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी ते एकमेकांची चेष्टामस्करी करत होते. आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने त्याचा राग येऊन त्याने मेडिकलचे काऊंटरवरील कात्री हातात उचलून काऊंटरच्या आतमध्ये येऊन जिशान रुस्तमअली खान याच्या पाठीत कात्रीने वार करुन त्यास गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झाल्याने जिशान यास औषधोपचारकामी साईदीप हॉस्पीटल, (अहिल्यानगर) येथे दाखल केले असता दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी तो उपचारा दरम्यान मयत झाला आहे. याबाबत नसीबअली रुस्तमअली खान यांच्या फिर्यादीवरुन कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७९१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता. या गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सपोनि जगदीश मुलगीर यांना तांत्रीक विश्लेषणाद्वारे माहीती समजली की, आरोपी हा पुणे येथे पळून गेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकातील अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करुन आरोपी याला ताब्यात घेणेकामी पूणे येथे तपास टीम रवाना केली. तात्काळ तपास लावून गुन्ह्यातील आरोपी शुमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) यास पुणे येथून शिताफिने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ८ तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास भिंगार पोलिस करीत आहेत.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!