मुंडेंचे नाव वापरून आमदारकी मिळवता नंतर त्यांनाच विसरता : ॲड. ढाकणेंची आ. मोनिका राजळेंवर टीका

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी-
मागच्या विधानसभा निवडणूकीत आमदार मोनिका राजळे यांनी खोटा प्रचार करून मतदारसंघात अकराशे कोटींची कामे केल्याचा दावा केला, याचा हिशेब विचारला तर एकही वाक्यात त्यांनी उत्तर दिलेले नाही. तुमचा सर्व विकासकामाचे हिशेब माझ्याकडे आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचे नाव केवळ निवडणुकीपुरते वापरायचे आणि नंतर पाच वर्षे त्याना विसरायचे. हा तुमच्या कुटुंबियांचा गेल्या दहा वर्षांची सवय असून, तुमचा प्रत्येक भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढीन यावेळी तुम्ही जनतेला उत्तर द्यायला बांधिल असताल अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापराव ढाकणे यांनी केली.

ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या वतीने महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित केलेल्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आज माणिकदौंडी येथे बोलत होती. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नासीर शेख, भगवान दराडे, बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, रामदास कर्डिले, सविता भापकर, विष्णूपंत पवार, रामराव चव्हाण, गहिनीनाथ शिरसाट, पोपट पठाण, महादेव दहिफळे, वैभव दहिफळे, संपत गायकवाड, हुमायून आतार, जलाल पठाण, चंद्रकांत भापकर, आलमगिर पठाण. राजेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.

ॲड. ढाकणे म्हणाले, गेली दहा वर्षे मोनिका राजळे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. याकाळात त्यांनी मतदारसंघात एक तरी ठोस काम दाखवावे. स्व.मुंडे साहेब यांचे नाव आपल्या सोयीच्या राजकारणासाठी वापरून त्यांनी आपले पद मिळविले मात्र त्यानंतर मुंडे यांच्या नावाचा त्यांना मोठा तिटकारा होतो. पाथर्डी शहरात मुंडे यांच्या नावाने अक्षरशः सांडपाण्याच्या नाल्यावर जॉगिंग पार्क उभारले तेही पालिकेच्या निधीतून आणि त्याठिकाणी स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यासाठी पैसे मागत वर्गणी गोळा केली. दहा वर्षे सत्ता भोगली ती त्यांच्या नावावर आणि पुतळा उभारण्यासाठी वर्गणी मागताना निदान जनाची तरी लाज बाळगायला हवी होती. पालिकेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार राजळेंच्या चांडाळ चौकडीने केलेला असून त्याचा पर्दाफाश पुराव्यानिशी आपण लवकरच करणार आहोत. मतदारसंघातील कामांसाठी आपण नेहमी मुंबईच्या मंत्रालयात जात असतो पण तिथे गेल्यानंतर मला शरमेने मान खाली घालावी लागते. याचे कारण कोणत्याही विभागात गेले की तिथले अधिकारी कुठून आलात मी म्हटलो, पाथर्डी का लगेच अधिकारी सांगतात तुमचे आमदार एक नंबर टक्केवारीतले आहेत. अशी ओळख आपल्या मतदारसंघाची तिथे झालेली आहे. एकेकाळी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी या मतदारसंघाचा दरारा संपूर्ण राज्यात निर्माण केलेला होता, आणि आज या लोकप्रतिनिधींनी शेवगाव व पाथर्डीची पत घालवली आहे. निव्वळ मोठ्या घोषणा करायच्या आणि कोट्यवधींच्या आकडेवारी सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग गेल्या दहा वर्षांपासून सुरू असून, केवळ भावनेच्या आहारी लोकांना नेत आपली सत्तेची भूक भागवायची हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे. ही जनसंवादा यात्रा तुमचे पितळ उघडे पाडल्याशिवाय थांबणार नाही. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक आव्हाड यांनी केले. आभार राजेंद्र धनगर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!