संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीने ट्विटर हॅंडलवर देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट केला. ज्यात पहाटेचा शपथविधी घेत फडणवीसांनी राजीनामाही दिला होता. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईल असे बहुचर्चित वक्तव्य केले होते. त्याची आठवण भाजपकडून पुन्हा करुन देण्यात आली आहे.
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते सातत्याने मविआ सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. यामुळे भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यानंतर भाजपकडून मुंबईत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. भाजपकडून या क्षणाचा जल्लोष साजरा केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला.