मानेवाडी सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील मानेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक नामदेव बडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ.राजश्रीताई ज्ञानदेव पाचपुते यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या ११ संचालकांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर ही चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड झाली आहे. सोमनाथ संकुडे, बबन सकुंडे, शिवाजी बडे, राजेंद्र कुटे, शहादेव पोफळे, रामा बडे, बळीराम धायतडक, सूर्यभान सकुंडे, शैला डोंगरे या सर्व संचालक मंडळाचा सत्कार युवा नेते धनंजय बडे यांच्या हस्ते करण्यात आला .


यावेळी बोलताना धनंजय बडे म्हणाले की ,सहकारी संस्था या ग्रामीण भागातील शेतकऱ्यानां आर्थिक ताकद देण्यासाठी मोलाची कामगिरी करत असतात . सेवा सोसायटीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार करून नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांचा विश्वास मिळवून संस्थेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक दृष्टीने लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.
भाजप नेते धनंजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार पारदर्शक करून सोसायटीला नावलौकिक मिळवून देऊ, अशी ग्वाही यावेळी नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन व संचालकांनी दिली. यावेळी धोंडिबा धायतडक, आजीनाथ बडे, गहिनीनाथ बडे, अशोक बारगजे, ज्ञानदेव पाचपुते, परशुराम पाचपुते मेजर, कैलास बडे, भाऊसाहेब बडे, कान्हू कृष्णा दरेकर, नारायण बडे, गंगाराम धायतडक इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

✒️संकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!