मानसिक तणावामुळे ब्रेन स्ट्रोक, चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा


👉क्राईम ब्रँचने दि.२० एप्रिलला रेणू शर्मा हिला मध्यप्रदेशातील इंदूर येथून अटक, 👉रेणू शर्मा हिच्यावर धनंजय मुंडेंकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप,  👉रेणू शर्माकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांमध्ये मोठे व्यवहार झाले आहेत.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबईः 
राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. धनजंय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे सांगण्यात येत आहे. करुणा शर्माच्या बहिणीने केलेल्या छळाच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मानसिक तणाव आला होता, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. दि.१३ एप्रिलला त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रेणू शर्मा हिच्यावर खंडणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.


क्राईम ब्रँचने दि.२० एप्रिलला  रेणू शर्माला  इंदूर (मध्यप्रदेश) येथे अटक करण्यात आली. शर्मा हिच्यावर धनंजय मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रेणू शर्माकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांत मोठे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. २०१७ मध्ये बँकेच्या ओशिवरा शाखेतील खात्यामध्ये मोठी रक्कम जमा झाली होती. फेब्रुवारीमध्ये फक्त ६ हजार ६५२  रुपये शिल्लक होते, असंही पोलीस तपासात उघड झाले आहे.
👉‘महिलेने खंडणीच्या पैशातून विकत घेतले डुप्लेक्स’
पोलिसांनी इंदूर-आधारित बिल्डर्सचे जबाब नोंदविले, त्यात त्यांनी म्हटले की,  रेणू शर्मा हिने फेब्रुवारीत इंदूरमधील नेपेनिया रोडवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे ५४.२ लाख रुपयांना डुप्लेक्स खरेदी केले होते. तिने खंडणीच्या पैशातून डुप्लेक्स खरेदी केल्याचा दावा करणारी कागदपत्रे जोडण्यात आली आहे. रेणू शर्माला हवालामार्फत ५० लाख रुपये आणि आयफोन दिल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. धनंजय मुंडे यांच्यावतीने इंदूरमध्ये रेणू शर्माला पैसे दिल्याचे दोन हवाला ऑपरेटर्सनी आपल्या जबाबात स्पष्ट केले होते.
👉सततच्या छळामुळे मुंडे हे मानसिक ताणाखाली
आरोपपत्रात म्हटले आहे की, “सततचा छळ आणि खंडणीच्या मागणीमुळे धनंजय मुंडे नैराश्यात गेले होते. त्यांना १२ ते १६ एप्रिलदरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मेंदूचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांची हॉस्पिटलायझेशनची कागदपत्रे आणि त्याचा वैद्यकीय अहवालावरून हे उघड झालं आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!