संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : सकलमातंग समाज जबाब दो मोर्चा आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे लाखो लहुसैनीकांच्या उपस्थीतीत यशस्वीरित्या पार पडले. महाराष्ट्रातील कानाकोप-यातुन मातंग समाज बंधुभगिनी आपल्या न्याय हक्कासाठी आजाद मैदान मुंबई येथे दीड ते दोन लाखापर्यंत संख्येने उपस्थित राहिले.हे आंदोलन केवळ समाजाच्या वतीने पुकारण्यात आले होते.मातंग समाजाचे आंदोलन चांगल्या शक्ती प्रदर्शनाने रखरखत्या उन्हात महापुरुषांच्या नावाने घोषणा देत यशस्वीपने पार पडले. समाजाच्या प्रमुख मागण्या- अ ब क ड वर्गीकरण आरक्षण करण्यात यावे. बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करण्यात यावी. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज आयोग लवकरात लवकर अंमलात आणावा.अशा मागण्यासाठी सकल मातंग समाज आजाद मैदान येथे उपस्थित होता.
मागण्यांची दखल घेण्यास विचारपीठावर नामदार शंभूराजे देसाई हे उपस्थित होते. मातंग समाजाच्या प्रलंबीत प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वतीने आलेल्या अधिका-यांची मातंग समाजाच्या नेत्यांशी चर्चा झाली असुन लवकरच प्रलंबीत मागण्या मंजूर करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.
जबाब दो आंदोलन आझाद मैदान मुंबई यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून नामदेवराव चांदणे, मधुकरराव पठारे, भगवानराव जगताप, सुनीलजी पवार, भगवानराव गोरखे, उमेशजी साठे ,विजयजी वडागळे,सुनीलजी सकट,अवीनाशराव ऊमाप,मनेशजी वैराळ,कांतीलालजी जगधने तसेच जिल्ह्यातुन अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विचार पिठावर महाराष्ट्रातील मातंग समाजाचे प्रमुख नेते तेलंगणाचे सन्माननिय मंदाकृष्णा मदिगा, विष्णूभाऊ कसबे, नागिनाताई कांबळे ,व्हि जी.रेड्डी,मच्छींद्रजी सकटे सर, पुजाताई देढे,भास्करराव शिंदे, शंकरराव तडाखे, राजाभाई सुर्यवंशी, रामचंद्रजी भरांडे, अशोकराव आल्हाट, विनोदजी वैरागर, अशोकराव शिंदे, बाळासाहेब बागुल,भिसे सर ईत्यादी राज्यातील सकल संघटनांचे संस्थापक व अध्यक्ष एकत्रीत होऊन उपस्थित होते.मातंग समाजाचे जबाब जो आंदोलन मोठ्या शक्तीप्रदर्शनाने यशस्वीपने पार पडले.