संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी – राहाता येथील शारदा विद्या मंदिर शाळेच्या १९९५ (इ.१०वी) बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी कोपरगावच्या गरजू क्षयरूग्णांसाठी २०० प्रोटीन डब्बे दिले. या दरम्यान जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत गरजू क्षयरूग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ यादव, तालुका आरोग्य अधिकारी कोपरगाव डाॅ. विकास घोलप, तालुका आरोग्य अधिकारी संजय घोलप (राहाता) व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डाॅ. आहेर यांनी क्षयरूग्णांशी संवाद साधून नियमित औषधोपचार व आहाराचे महत्व समजावून सांगितले.
कोपरगाव तालुक्यातून दानशूर व्यक्तिंनी पुढे येऊन” निक्शय मिञ” म्हणून भारत सरकारच्या या “टि बी मुक्त भारत अभियानामध्ये ” सहभाग नोंदवावा असेही यावेळी डॉ.आहेर आवाहन केले.
याप्रसंगी सहाने मॅडम, उमेश त्रिभूवन, सुजय मगरे, श्रीमती सत्यशीला मोरे, क्षयरोग कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन : राजेंद्र दुनबळे, शिर्डी