माजी आयजी बी.जी.शेखर पाटील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्यपदी

माजी आयजी बी.जी.शेखर पाटील यांची
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्यपदी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : महाराष्ट्र शासनाने साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी.जी शेखर पाटील यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांना या पूर्वी शूर सरसेनापती संताजी या सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक साहित्यकृतीस 2022या वर्षातील रा .ना. नातू पुरस्कार मानपत्र आणि एक लाख रुपयांची रक्कम असा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आलेला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील एक उच्चपदस्थ आयपीएस अधिकारी. असून देशपातळीवरील स्पर्धेत सहा वेळा भाग घेऊन लॉन टेनिस खेळामध्ये नैपुण्य मिळवलेल्या या सर्वगुण संपन्न पोलीस अधिकाऱ्याने साडेपाच वर्ष सातत्य व जिद्द ठेवून सुमारे आठ हजार किलोमीटर प्रवास करून जिथे जिथे मुघलांच्या विरुद्ध लढाया झाल्या तेथे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचे आकलन करून लिहिलेली उत्कृष्ट कलाकृती म्हणजे सरसेनापती संताजी शंभूराजांच्या क्रूर हत्येचा प्रतिशोध आणि रांजुई हे पुस्तके सुलभ लेखणीतून आणि साडेपाच वर्षाच्या मेहनतीतून साकारलेले शूर सरसेनापती संताजी या पुस्तकास महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद यांच्याकडून शूर सरसेनापती संताजी या सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक साहित्यकृतीस 2022या वर्षातील रा .ना. नातू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे .
अत्यंत सरळ सोपी भाषा व कलात्मक मांडणी ,रसिक वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडनारी ऐतिहासिक काळातील संदर्भांचे आकलन भौगोलिक मापदंडातून केलेले ऐतिहासिक संशोधन, हुबेहूब प्रसंग उभे करण्याचे कौशल्य जणू आपण त्या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत असा भास निर्माण करण्याची हातोटी, निसर्गाचे केलेलं सुंदर वर्णन प्रत्येक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला दिलेला न्याय, समतोल लेखना तील प्रभुत्व आहे. गुन्हे विश्व वरील शोध यासह अनेक पुस्तकांचे लिखाण केले असून डॉक्टर बीजी शेखर पाटील यांचे व्यक्तिमत्व पोलीस दलामध्ये स्वतःच्या कर्तुत्वाने आदर्श निर्माण करणाऱ्या, राष्ट्रपती पदक व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून युनो मेडल ने गौरविण्यात आलेले डॉक्टर बीजी शेखर पाटील यांच्या साहित्य निर्मितीत वैविध्य आणि सातत्य आहे.
महाराष्ट्राच्या भूमिपुत्राला हा सन्मान देण्यात आला. डॉक्टर बी.जी शेखर हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास येथील शेतकरी परिवारातून परिश्रमपूर्वक अभ्यास करून वरिष्ठ अधिकारी पदावर धडकेबाज काम केल्याबद्दल यापूर्वी राष्ट्रपती पदकासह विशेष पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!