महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 च्या पदाधिका-यांची ८ विषयांवर राज्यमंत्री ना. सत्तार यांच्याशी चर्चा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई- राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याशी ग्रामविकासमंत्री, मुंबई दालनात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 च्या पदाधिकारी समवेत मंगळवारी (दि.१५) झालेल्या बैठकीत आठ विषयांवर चर्चा झाली. यावेळी बैठकीस राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, माजी अध्यक्ष लहानु गायकवाड, उपाध्यक्ष सुचित घरत, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम, राज्य समन्वयक उदयराज शेळके व राज्य प्रसिद्ध प्रमुख बापू अहिरे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान बैठकीत ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करुन पंचायत अधिकारी पद निर्माण करणे, सदर पदाबाबत उच्चस्तरीय समिती नेमून सहा महिन्यांत अहवाल प्राप्त झालेवर सदर विषयावर निर्णय घेणेत येईल. शैक्षणिक अर्हता पदविधर करणेबाबत सदर विषयावर विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागवून एक महिनेत निर्णय घेणेत येईल. ग्रामविकास सोडुन इतर विभागाची अतिरिक्त कामे कमी करणेबाबत. या विषयावर चर्चा होऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान संचालक
मित्रगोत्री यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४९ नुसार उदा कृषी समिती सचिवबाबत ज्या ज्या विभागानुसार त्या त्या खातेतील सचिव राहतील. याबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात बदल करणेत येईल व तसेच, फळबाग लागवडबाबत मंत्री यांनी सदर विषय हा कृषी खातेचा असल्याने ना. सत्तार यांनी सदर अहवाल तात्काळ राज्य कृषी यंत्रणाकडे पत्रव्यवहार करण्याचे आदेश देणेत आले. फळबाग लागवड विषयी मंत्री महोदय यांनी तुमच्याबरोबर असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांना सांगितले.
एक पंचायत एक ग्रामसेवक या विषयावर मंत्री यांनी सदर विषयाबाबत मान्यता दिली. याबाबत लवकरच निर्णय घेणेत येईल. विस्तार अधिकारी पद वाढविणेबाबत सद्यस्थितित कोरोनामुळे बरेच शासकीय पदे रिक्त आहेत. नविन पदे निर्माण करणे शासनाला शक्य नाही.
कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामसेवकांचे कुटुंबांना विमा कवच रु.५० लाख निधी देणेबाबत चर्चा करुन लवकरच आदेश पारित करणेत येतील. वैद्यकीय बिलाबाबत कॅश सुविधा उपलब्ध करणेबाबत. या विषयाबाबत संबंधित खातेकडून पण प्रस्ताव सादर करणेत यावा असे सांगितले. तसेच रू.१५०० कायम प्रवास भत्ता आदेशातील जाचक अटीबाबत चर्चा करणेत आली, असता सदर प्रस्ताव संघटनेकडून सादर करणेस मंञी महोदयांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!