मलकापूर येथे गावकऱ्यांना रोखले राखेच्या हायवा ; घटनास्थळी पोलिसांची भेट


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

परळी वैजनाथ – औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेच्या अवैध वाहतूकीसंदर्भात पुन्हा एकदा गावकऱ्यांचा रोष दिसून आला असून तालुक्यातील मलकापूर येथील गावकऱ्यांनी गुरुवारी (ता.०१) रात्री 9 वाजता 25 ते 30 हायवा गाड्या अडवून ठेवल्या आहेत. राखेच्या अवैध वाहतूक थांबावी यासाठी नागरीक त्रस्त असताना प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथे कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहेत. २५० मेगावँटचे तीन विद्युत निर्मिती केंद्र असून या तीन संचातून ७५० मेगावँट विद्युत निर्मिती केली जाते. या विद्युत निर्मिती संचातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडते. यातील काही राख बंद गाड्यातून सिमेंट फँक्टरीसाठी पाठवली जाते तर काही राख संचाच्या जवळ असलेल्या तळ्यात सोडली जाते. तळ्यातील राख हायवा गाड्यातून विटभट्ट्यांसाठी अवैधरित्या, उघडी वाहतूक केली जाते. ही राख वाहतूक करत असताना हायवा टिप्परच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक होत असल्याने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापासून २० ते २५ किलोमीटर रस्त्यावर इथून तिथून, गतीरोधकाजवळ,रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडली जाते. पडलेली राख सुसाट वेगाने जाणाऱ्या गाड्यामुळे हवेत पसरते व मोठ्या प्रमाणावर हवेने उडते. यामुळे रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी रात्री मलकापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पर मधून राख पडल्याने गावातील एक दुचाकीस्वार जखमी झाला. गावकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने गावकऱ्यांनी एकत्र येवून या मार्गावरून वाहतूक करणारे जवळपास 25 ते 30 हायवा टिप्पर अडवून ठेवले आहेत. मागच्याच आठवड्यात पांगरी येथे महिलांनी अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्पर मधून राख पडून हवेचे प्रदूषण होत असल्याने १०० हायवा अडवून या महिलांनी हायवा टिप्पर च्या ड्रायव्हरला पडलेली राख साफसफाई करण्यास भाग पाडले होते. तर दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणाला त्रस्त होवून गेल्या अनेक वर्षांपासून सहपरिवार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ऐवढे सर्व नागरीक त्रस्त असताना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे व स्थानिक प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत असल्याने सातत्याने नागरीकांचा राग अनावर होत आहे. सातत्याने नागरीक हवेतील प्रदुषणामुळे बेजार होत असताना लवकरच मोठ्या प्रमाणावर आंदोलनाचा भडका होण्याची शक्यता आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास नागरीक रस्त्यावर उतरून आंदोलने करतील. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली होती.
संकलन महादेव गिते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!