सावरगाव घाट (ता.पाटोदा, जि.बीड) दसरा मेळावा उत्साहात साजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार आणि ओबीसी आरक्षणचा निर्णय लागेपर्यंत डोक्यावर फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, असे पंकजाताई मुंडे यांनी सावरगाव (ता.पाटोदा,जि.बीड) या संत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळावरील आयोजित मेळाव्यात प्रतिपादन केले.
या दरम्यान पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या आता या राज्य सरकारकडे रुपयाचे बजेट नाही. माझ्याच योजनामधील काम सुरू आहेत. काहींनी मंत्रिपद भाडयाने दिली आहेत, अशी घणाघणीत टोला धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मारला. तसेच त्यापुढे म्हटले की, माझ्याकडे सेल्फीसाठी नाही तर कामे घेऊन या, मी चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
घरची पुरण पोळी सोडून तुम्ही उन्हातान्हात या भक्तिगडावर आला आहात. त्यामुळे मी आपल्या समोर नतमस्तक होऊन पाया पडते. आता माझी झोळी कमी पडत आहे. इतके प्रेम तुम्ही मला दिले आहे. हेलिकॉप्टरमधून उतरून बैल गाडीत बसणे, असा देखणा सोहळा देशात कुठेच होत नाही. आज महाराष्ट्रात जी सामान्य माणसाच्या परिस्थिती आहे. ती बदलण्यासाठी भक्तिगडावर हा मेळावा घेत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी दसऱ्यानिमित्त कार्यक्रमात आज आपला संदेश देत असताना भेदभाव मिटला पाहिजे, हे सांगितले तेच काम आयुष्यभर गोपीनाथ मुंडे साहेबांनी केले. त्यांचाच वारसा पुढे चालवून तो मिटवण्याचं काम मी करत आहे.
अतिवृष्टी ,कोरोना, यामुळे मेळावा कसा घ्यायचा, असं मला काही कार्यकर्त्यांकडून सांगितले गेले. पण अश्या कठीणवेळीच लोकांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, म्हणून आपण मेळावा घेणार आहे, असे मी त्यांना सांगितले.
सरकार कोणाचे ही असो सामान्य माणूस उपाशी राहतो आणि उपाशीच आहे. त्यांच्यासाठी सत्ता असो किंवा नसो काम करत राहणार. पुढील आठवड्यात ऊसतोड कामगारांच्या सोबत गावागावात जाऊन संवाद साधणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
सरकारने घोषित केलेले पॅकेज पुरेसे नाही.नरेंद्र मोदींचे दोन हजार रुपये तेवढे फक्त शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत गावागावातील धार्मिक स्थळे, दवाखाने स्वछ ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम सुरू करणार असून याची जबादारी आपण घ्यावी असे तरुणांना आवाहनही करत त्या पुढे म्हणाल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावागावात व्यसन मुक्तीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी उपस्थित तरुणाना तंबाखू,मावा,गुटखा याचे दहन करा, यावेळी असेही आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.
दरम्यान खासदार डाॅ प्रितम मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षचे प्रमुख महादेव जानकर यांचे ही भाषणे झाली. यावेळी बोलताना खा. प्रितम मुंडे म्हणाल्या की, मुंडे परिवार म्हणजे केवळ पंकजाताई मुंडे आणि प्रितम मुंडे नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला हा जनसागर म्हणजे मुंडे परिवार आहे. इथे येणारा प्रत्येकजण या अपेक्षेने येतो की, कधीन् कधी विकासाची गंगा आपल्यापर्यंत येईल. त्यासाठी ती ऊर्जा भक्तिगडावर मिळते. ती घेण्यासाठी प्रत्येकजण या ठिकाणी येत असतो. तुम्ही उन्हात असलेला हा समाज आहे. म्हणून स्टेजवर आज छत नाही, असे खा. मुंडे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
माजी मंत्री महादेव महादेव जानकर म्हणाले, आजचा कार्यक्रम म्हणजे हा कुठला राजकीय पक्ष्याचा कार्यक्रम नाही. आमदार होतील खासदार होतील पण नेता होता येत नाही, म्हणून नेता जपला पाहिजे आणि आपला नेता म्हणजे पंकजाताई मुंडे आहेत. पंकजाताई मी तुमची मान खाली जाऊन देणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या कानात कुर्रर केलं आहे. तुम्ही काळजी करू नये, पंकजाताई हा जानकार मेला तरी तुझी साथ सोडत नसतो. भगवानबाबा हे ब्राम्हण, वंजारी, सुतार, लोहार, माळी ,साळी, धनगर या सर्व सर्व जाती धर्मचे होते.
तसेच गोपीनाथ मुंडे साहेब हे सुद्धा सर्वांचे होते. खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव घेत जानकर म्हणाले की, मुंडे साहेब नसते तर हा महादेव जानकर मेंढ्या संभाळत बसला असता. मी तिकीट मागणारा नसून देणारा पट्ट्या आहे. त्यामुळे मी घबराट नाही, असे जानकर यांनी ठणकावून सांगितले.
मुलगा मेला तरी चालेल पण आई मरता कामा नये, म्हणून ओबीसी नो पंकजाताई मुंडे यांच्या मागे आपण उभे राहावे, असे आवाहनही यावेळी श्री जानकर यांनी केले.
आपल्या प्रतिनिधींना जातनिहाय जणगणना का होत नाही? याचा जाब उपस्थितांनी विचारला पाहिजे, असे माजीमंत्री श्री जानकार शेवटी म्हटले.
✍संकलन ~पत्रकार सोमराज बडे