संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पिंपळगाव माळवी येथील भीमाबाई रखमाजी रायकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ९८ वर्षांच्या होत्या. त्याच्यापश्चत्या चार मुले, ८ मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै.भीमाबाई रायकर या अभंग, भक्तीगीत मधूर आवाजात गात होत्या. नागरदेववळे येथील उद्योजक राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब बोरुडे यांच्या त्या आजी होत्या. त्यांच्या या धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सगळ्यांनच चांगल्या परिचित होत्या. त्यांच्या या अचानक जाण्याने पिंपळगाव माळवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.