संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
कर्जत – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड येथील भिमानदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुध्द अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, व कर्जत उपविभाग पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, पोकॉ रोहित मिसाळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतुकीविरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करुन कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. या आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कर्जत तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करण्याकरीता पेट्रोलिंग करत असतांना पोनि अनिल कटके यांना माहिती मिळाली की, तेजस मोरे व चाँद शेख हे परप्रांतीय मजुरांचे सहाय्याने खेड (ता. कर्जत) शिवारातील भिमानदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहनात भरुन वाहतूक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि अनिल कटके यांनी माहिती लागलीच पथकास कळवन महसूल कर्मचारी व पंच यांच्यासह खात्री करुन कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या. सुचनां प्रमाणे पथकातील पोलीस अंमलदार यांनी महसुल कर्मचारी व पंच असे खेड, (ता. कर्जत) येथे नदीपात्रा जवळ जाऊन स्पिडबोट सोबत घेऊन अवैध वाळू उत्खनन करणारे बोटीचे शोध घेता खेड गांवाचे शिवारात भिमानदी पात्रात १ यांत्रिकी बोट व १ सेक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करतांना दिसले. पथक बोटच्या दिशेने जाऊन यांत्रिकी बोटर छापा टाकून बोटीवरील लोकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना त्यांचे गांव विचारले असतां त्यांनी सुकरदी मंजूर शेख (वय ३२), फारूख रोहिम शेख (वय ३२, दोन्ही रा. पहाडगांव, ता. उधवा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत), रफिकूल ऊर्फ इस्माल मुस्ताफा शेख (वय ३०), रेजाऊल माजद शेख (वय २४, दोन्ही रा. बाघपिंजरा, ता. मोहनपुरा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे यांत्रिकी बोट कोणाच्या मालकीची आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी तेजस मोरे (रा. खेड, ता. कर्जत) व चाँद शेख (रा. वाटलुज, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या मालकिची आहे. आम्हाला बोटीवर रोजंनदारीवर कामाला ठेवले आहे, असे सांगितल्याने सर्व आरोपींनी संगनमताने अवैधरित्या भिमानदी पात्र जलाशयातून यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकिची वाळू अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल असे कृत्य केल्याने अ.क्र. १ ते ४ यांना ९ लाख रु. किंमतीचे एक यांत्रिकी फायबर बोट पाण्यात बुडविली व एक सेक्शन पंपा ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९९/२०२२ भादविक ४३९, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहे.