संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः भिंगार ह्द्दीत घरफोडी करणारी तिघे चोरटे पकडण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. अकबर लुकमान खान (रा.दौलावडगाव ता.आष्टी जि.बीड), अयान रईज शेख (रा.कोठी ता.जि.अहिल्यानगर) आणि एक अल्पवयीन अश्या तिघांना पकडण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यंाच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोउपनि गजेंद्र इंगळे, पोहेकॉ दीपक शिंदे, रवि टकले, नंदकुमार पठारे, संदीप घोडके, पोकॉ प्रमोद लहारे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु, नितीन शिंदे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.29 डिसेेंबर 2024 रोजी रात्री 11.30 ते दि 30 डिसेेंबर 2024 चे सकाळी 10.15 वाजण्याच्या दरम्यान वडारवाडी नगर-पाथर्डी रोडवरील असलेले न्यू सिटी पॉईंट नावाचे मेडीकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानाच्या आत प्रवेश करुन पैशाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली व मस्जीदच्या मदती करीता काउंटरवर ठेवलेली पेटी जमा रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली, वसीम सुलेमान खान (रा. सदरबाजार, भिंगार) यांनी दि.2 जानेवारी 2025 रोजी फिर्याद दिली होती. त्यानुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं 05/2025 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 305,331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या गुन्ह्यातील आरोपी हे दौलावडगाव (ता.आष्टी जि. बीड) येथे येणार असल्याची माहिती सपोनि जगदीश मुलगीर यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ तपासी टीममधील अंमलदार यांना माहिती देऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. भिंगार कॅम्प पोलीसांची टीमने माहिती ठिकाणी जाऊन सापळा लावला. या दरम्यान पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते तेथून फरार झाल्याने त्यांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असतांना आरोपी हे संगमनेर येथील बसस्थानक येथे असल्याची माहिती समजल्याने त्या ठिकाणी पोलीस टीम त्यांचा शोध घेण्याकरीता रवाना झाले. बसस्थानक येथे पोलीस टीमने सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यांना जागीच ताब्यात घेतले, विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली. आरोपींना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात येथे घेऊन येऊन त्यांच्याकडे अधिक तपास करीत असतांना त्यानी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व किराणा माल हस्तगत केला आहे.