संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
श्रीरामपूर – तालुक्यातील निमगांव खैरी येथून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बेकायदशिररित्या जवळ बाळगणा-यास पकडण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके (वय 23, रा. घायगांव, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद हल्ली रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार एलसीबी टिम’चे पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप दरदंले, राहुल सोळुंके व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
एलसीबी टिम’ने श्रीरामपुर तालुक्यातील, श्रीरामपूर-पुणतांबा रोडवरील, निमगांव खैरी गांवातील हॉटेल गितगंगा येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असतांना थोड्याच वेळात माहितीनुसार एकजण संशयीतरित्या फिरतांना दिसला. एलसीबी टिम’ची खात्री होताच पथकाने संशयीतास ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नावे प्रविण ऊर्फ पव्या सुरेश साळुंके (वय 23, रा. घायगांव, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद हल्ली रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळाली. त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. गावठी कट्टा व जिवंत काडतुस कोठुन आणले याबाबत विचारपुस करता तो सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला पोलिस खाक्या दाखविताच त्याने गावठी कट्टा व जिवंत काडतुस हे प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे (रा. निमगांव खैरी, ता. श्रीरामपूर) यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्याचा दिले पत्त्यावर जाऊन शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.
तो निमगांव खैरी (ता. श्रीरामपूर) परिसरात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असा एकूण ३१ हजार रु. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आला. याबाबत एलसीबीचे पोना शंकर चौधरी यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. १३४/२०२३ आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर तालुका करीत आहे.
आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द अहमदनगर आर्म ॲक्ट, गुन्ह्याचा कट करणे व माहिती लपविणे असे 2 गुन्हे दाखल आहेत.
भिंगार हद्दीत ६ लाखांचे गोमांस जप्त ; एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे ४ हजार किलो गोमांस व एक आयशर टेम्पो असा एकूण १३ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अहमदनगर – औरंगाबाद रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या पाठीमागे जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबीचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ संदीप पवार, पोहेकॉ संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, पोकॉ विजय धनेधर, कमलेश पाथरुट आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी टिम’ व दोन पंच असे वाहनाने जाऊन वाहनास पकडण्या करीता नगर-औरंगाबाद रोडवर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अकबरनगरच्या समोर ए.बी. फब्रीकेशनच्या समोर जाऊन खात्री केली. त्याठिकाणी माहितीनुसार लाल रंगाची आयशर (एमएच ०४ जेयु २१०१ ही उभी असताना दिसली, या दरम्यान पोलिसांना व पंचाची खात्री पटताच अचानक छापा टाकला आयशरवरील चालक सिटवर बसलेल्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुझफर आयुब शेख (वय ३२, रा. खडकत ता. आष्टी जि. बीड) असे सांगितले. आयशर टॅम्पोच्या पाठीमागील हौदाची पाहणी केली. त्यामध्ये गोवंशीय जातीचे जनावरांचे गोमांस हे बर्फामध्ये दिसले. चालकास गोमांसाबाबत विचारपुस करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमांस हे तौफीक युनुस कुरेशी (रा.व्यापारी मोहल्ला सुभेदार वस्ती, अहमदनगर) यांच्या मालकीचे असल्याचे त्याने सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्जात ६ लाख रुपये किमंतीचे अंदाजे ४ हजार किलो अर्धवट कापलेले गोमांस व वाहतुकीसाठी वापरेला एक ७ लाख रुपये कि.ची लाल रंगाचा आयशर टॅम्पो अस एकूण १३ लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एलसीबीचे पोकॉ कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १५१/२०२३ प्रमाणे भादवी कलम २६८,३४ महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (क), ९ (अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई भिंगार कॅम्प पोलीस करीत आहे. आरोपी मुझफर आयुब शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या शविरुध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन अन्वये ५ गुन्हे दाखल आहेत.