भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील १२० गुन्हेगार हद्दपार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर – गणेश विसर्जनचे अनुषंगाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील १२० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
दि.15 सप्टेंबर 2024 रोजी भिंगार शहरातील गणेश विसर्जन होत असल्याने या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(२) प्रमाणे अहमदनगर शहराच्या भौगोलिक हद्दीमध्ये गणेशोत्सवा दरम्यान दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजीचे १ वा. ते दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी ११. ५९ वा. पावतो या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण १२० गुन्हेगारांना प्रवेशबंदी केल्याबाबतचा नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी काढले आहेत.
दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत भिंगार शहरात अंतिम चौक येथे चेतन भागुजी शहापुरकर (रा. पाटील गल्ली, भिंगार) हा नगर प्रांताधिकारी यांच्याकडील दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी ते दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजीचे अहमदनगर शहराचे भौगोलिक हद्दीमध्ये प्रवेश बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आल्याने त्याचेविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसपी राकेश ओला, पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार सपोउपनि रेवन्नाथ दहिफळे, पोहेकॉ अजय गव्हाणे, दीपक शिंदे, संदिप घोडके, अमोल आव्हाड, समीर शेख आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे