संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – रक्षामंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाची दि.4 ऑक्टोबर 2021ला पहिले गॅझेट प्रसिध्द करण्यात आले होते. त्यावेळी भिंगार-अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनीत सदस्य वसंत चांदमल राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात दुसर्यांदा वाढ मिळाली. पुन्हा यात तिसर्यांदा वसंत राठोड यांना मनोनीत सदस्यासाठी दि.11 फेब्रुवारी 2023 पासून सहा महिने मुदत वाढ मिळाली आहे.

भिंगार-अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनीत सदस्य म्हणून वसंत राठोड यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर भिंगारवासियांना अनेक वर्षांपासून येणार्या समस्यांचा अभ्यास केला. मागील एका वर्षाच्या कार्यकाळात श्री राठोड यांनी स्वच्छता, पाणी, आरोग्य या प्रमुख मुलभूत गरजा सोडविण्यासाठी लक्ष दिले. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन पाणीपट्टी वाढ करत असताना त्यास मनोनीत सदस्य श्री राठोड यांनी विरोध केला. या काळात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले. यात खा. विखेंनी पाणीपट्टी सारखा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय थेट लोकसभेत उपस्थित केला. तसेच श्री राठोड यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील मालमत्ता वारसा नोंदणीत येणार्या प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी संबंधित प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केेले.तर कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळा, हॉस्पिटल, ऑफिस प्रशासन यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सुधारणा करण्यात आली. यासाठी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष रसेल डिसूजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांचे विशेष बोर्डचे मनोनीत सदस्य वसंत राठोड यांना मोलाचे सहकार्य मिळाले.
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा सहकार्याने शासनाच्या विविध योजना (पंतप्रधानमंत्री उज्वल योजना, आत्मनिर्भार स्वःनिधी योजना, आयुष्यमान भारत, ई-श्रम कोर्ड योजना) या योजना भिंगार शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम श्री राठोड यांनी केले.
भिंगार शहरातील रस्ते, पथदिवे यासह नागरी सुविधांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, खा.डॉ. सुजय विखे पाटील, महसूत्रमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी श्री राठोड यांनी पाठपुरावा केला, आता यासंदर्भात कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी भिंगार शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश केला आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाला एमईएस कडून व्यावसायिक महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागत होते. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाणीपट्टी पोटी महिनाकाठी मोठी रक्कम एमईएस द्यावी लागत होती. पर्यायी त्याचा ताण सर्वसामान्यांवर पडत होता. परंतु यातून नागरिकांना दिलासा मिळावा, म्हणून खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मदतीने बोर्डाचे मनोनीत सदस्य वसंत राठोड यांच्या पुढाकाराने तसेच बोर्डाचे प्रशासन अधिकारी यांनी अहमदनगर महापालिका प्रशासनाकडे कमी दराने पाणी मिळाण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे महापालिकेकडून अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून आता भिंगारवासियांना फक्त्त 12 रुपये क्युमी या घरगुती स्वस्त दराने म्हणजेच भिंगार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अहमदनगर महापालिकेने तयारी दर्शवली आहे, यासंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.