संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई- भाजपा नेत्या तथा माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी त्यांचा भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. श्री मुंडे यांचा प्रवास दरम्यान त्यांच्या गाडीला अपघात झाला होता, त्यात ते जखमी झाले होते.
