भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या
प्रदेश उपाध्यक्षपदी तुषार पोटे यांची नियुक्ती
संग्राम सत्त्तेचा वृत्त्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने भाजपा भटके विमुक्त आघाडीची राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे यांनी नुकतीच जाहीर केली. यामध्ये नगरचे तुषार पोटे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
श्री.तुषार पोटे यांनी 2013 मध्ये भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष म्हणून तर 2015-19 मध्ये भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले तर सध्या नगर शहर भाजपाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पा., शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, प्रा.भानुदास बेरड, वसंत लोढा, विधानसभा प्रमुख भैय्या गंधे, अॅड.विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, किशोर बोरा आदिंनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.